april fool fraud sms website be alert from scammers know details  Sakal
Personal Finance

आर्थिक ‘एप्रिल फूल’!

एक एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या परिचित लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगून त्यातून होणाऱ्या फसवणुकीतून होणाऱ्या गमतीचा आनंद घेण्याची प्रथा आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. वीरेंद्र ताटके

एक एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या परिचित लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगून त्यातून होणाऱ्या फसवणुकीतून होणाऱ्या गमतीचा आनंद घेण्याची प्रथा आहे.

अशा फसवणुकीतून संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा हेतू नसला, तरी काही वेळेस ही ‘एप्रिल फूल’ची गंमत हानिकारक ठरू शकते. आर्थिक विश्वातदेखील असे ‘एप्रिल फूल’ करणारे लोक असतात आणि यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे ‘एप्रिल फूल’ वर्षभरात कधीही होऊ शकते. अशा काही आर्थिक ‘एप्रिल फूल’ची माहिती घेऊ या.

बँक खाते ब्लॉक केल्याचा संदेश

आपले बँक खाते ब्लॉक केल्याचा संदेश आपल्या मोबाइलवर येतो आणि ते खाते पूर्ववत सुरू करण्यासाठी महत्त्वाची माहिती मागितली जाते. परंतु, कोणतीही बँक अशी माहिती मोबाइलद्वारे घेत नाही, हे लक्षात ठेवावे आणि अशा संदेशाला प्रतिसाद देऊ नये.

वीज पुरवठ्याबाबतचा संदेश

‘तुमचा वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून संदेशात दिलेल्या खात्यावर थकीत बिलाची रक्कम ऑनलाइन पाठवावी’ अशा आशयाचा संदेश मोबाइलवर येतो. वीज पुरवठा करणारी कंपनी कधीही अशा प्रकारे संदेश पाठवत नाही, हे लक्षात ठेवून त्याकडे दुर्लक्ष करावे.

बनावट संकेतस्थळे

अधिकृत संकेतस्थळाच्या नावात किंचित बदल करून फसविण्याचा प्रयत्न केला जातो आणि बनावट लिंक सर्वत्र पसरवल्या जातात. अशा संकेतस्थळांच्या विश्वासार्हतेविषयी खात्री केल्याशिवाय कोणतीही लिंक उघडू नये.

फसवे फोन

आपण स्वत: बँकेचे अथवा विमा कंपनीचे अधिकारी आहोत, असे भासवणारे काही फोन येतात आणि भीती दाखवून आपल्याकडून महत्त्वाची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. कोणतीही बँक किंवा विमा कंपनी फोनवरून अशी माहिती कधीही घेत नाही, हे लक्षात ठेवून त्याकडे दुर्लक्ष करावे.

मोबाइल अॅपचा वापर

एखादे अॅप आपल्या मोबाइलवर अथवा संगणकावर डाउनलोड करायला सांगण्यासाठी आपल्याला फोन येतो आणि त्यासाठी एक लिंक पाठवली जाते. हे अॅप आपण डाउनलोड केले, की आपल्या मोबाइल किंवा संगणकाचा संपूर्ण ताबा घेऊन महत्त्वाची माहिती चोरली जाते, त्यामुळे कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्यातील सत्यता पडताळून पाहावी.

‘एटीएम’मधून माहितीची चोरी

या प्रकारात ‘एटीएम’वर आपल्याला मदत करण्याच्या बहाण्याने सर्व माहिती काढून घेतली जाते आणि तिचा वापर करून आपल्या खात्यातील पैसे काढले जातात. त्यामुळे ‘एटीएम’वर पैसे काढताना, आपला पिन इतरांना दिसणार नाही याची खात्री करावी.

इंटरनेट बँकिंग

‘बँकेतून बोलतो आहे, आपली इंटरनेट बँकिंगची माहिती द्या’ अशा आशयाचा फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, कोणतीही बँक ग्राहकांचा लॉग-इन आयडी किंवा पासवर्ड मागत नाही, हे लक्षात ठेवून ही माहिती देऊ नये.

बक्षिसाची रक्कम

‘आपल्याला बक्षीस लागले आहे आणि त्याची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असा संदेश किंवा ई-मेल आला, तर आनंदून न जाता ती एक फसवणूक आहे, हे लक्षात घेऊन तो संदेश किंवा ई-मेल लगेच डिलिट करून टाकावा.

पोलिस खात्यातून फोन

‘आम्ही पोलिस खात्यातून बोलत आहोत, तुम्हाला काही कारणासाठी झालेला दंड ऑनलाइन भरा’ अशा आशयाचा फोन आला, तर त्याकडे दुर्लक्ष करावे. कारण पोलिस खाते अशा प्रकारे फोन करून दंडाची मागणी करत नाही. आपण स्वतः योग्य ती काळजी घेऊन अशा आर्थिक ‘एप्रिल फूल’पासून वाचवण्याचा निर्धार आजपासून करू या.

सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंग

या प्रकारातून आपल्या मोबाइलमधील महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. प्रत्येक ठिकाणी असे होईलच असे नाही. परंतु, आपण त्यादृष्टीने सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा प्रकारे माहिती चोरण्याच्या प्रकाराला ‘ज्यूस जॅकींग’ म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने याविषयी सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs SA 2nd Test : १ चेंडू १० धावा, असं कधी झालंय का? बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटीत घडलं विचित्र काहीतरी Video

Latest Maharashtra News Updates live : माहीम मतदारसंघात राज ठाकरेंच्या मुलाच्या पाठीशी भाजप अजूनही ठाम : फडणवीस

BAN vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला, पण टीम इंडियाला घाम फुटला

Vasmat News : लिट्ल किंग्ज शाळेतील मुलांनी जमा केले 5 क्विंटल अन्न, सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथ मुलांची दिवाळी गोड करणार..

Pune Metro Update : पुणेकरांनो लक्ष द्या! लक्ष्मीपूजनावेळी पुणे मेट्रो राहाणार बंद; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT