Mukesh Ambani Sakal
Personal Finance

Campa Cola : मुकेश अंबानींच्या एंट्रीने 'प्राइस वॉर', कॅम्पा कोला लॉन्च होताच कोका-कोलाने घेतला मोठा निर्णय

मुकेश अंबानींनी गेल्या वर्षी मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी करार केला होता.

सकाळ डिजिटल टीम

Campa Cola: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी व्यवसाय सतत वाढवत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी कोला मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी करार केला होता.

रिलायन्सकडून 70 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर्स लॉन्च करण्याची घोषणा केली होती. होळीनंतर लगेचच बाजारात कॅम्पा कोलाची एंट्री झाली.

यानंतर कोला मार्केटमध्ये प्राइस वॉर सुरू झाले असून इतर कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. (As Campa Cola returns, Coca-Cola cuts 200 ml bottle price by Rs 5)

कॅम्पा कोलाचा 22 कोटींचा करार :

रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने 2022 मध्ये प्युअर ड्रिंक ग्रुपकडून 22 कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानंतर, प्रथम दिवाळीला उत्पादन लॉन्च करण्याची योजना होती, परंतु नंतर ती होळी 2023 पर्यंत वाढविण्यात आली.

अलीकडेच, कॅम्पा कोला हा 50 वर्ष जुना आयकॉनिक पेय ब्रँड ऑरेंज, लेमन आणि कोला फ्लेवर्समध्ये सादर करण्यात आला आहे. त्याची थेट स्पर्धा बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राईटशी आहे.

कोका कोलाने किंमत कमी केली :

कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर्स लाँच केल्यानंतर कोला मार्केटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या इतर कंपन्यांवर दबाव येऊ लागला आहे.

दरम्यान, तापमानात झालेली वाढ आणि शीतपेयांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे, कोका-कोलाने उत्पादनांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डनुसार, कंपनीने 200ML बाटलीची किंमत 5 रुपयांनी कमी केली आहे.

'या' राज्यांमध्ये किंमतीत केली कपात :

अहवालानुसार, कोका-कोला कंपनीच्या किंमती कमी करण्याच्या निर्णयानंतर, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 200 एमएलच्या बाटलीची किंमत 15 रुपये होती, ती आता 10 रुपये झाली आहे.

यासह, कोका कोलाच्या काचेच्या बाटल्या ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांद्वारे भरलेल्या क्रेट ठेवी देखील माफ करण्यात आल्या आहेत, ज्याची किंमत साधारणपणे 50 ते 100 रुपये आहे.

'द ग्रेट इंडियन टेस्ट' पुन्हा बाजारात आली :

कॅम्पा कोला हा भारताचा स्वतःचा ब्रँड आहे. 1949 ते 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत प्युअर ड्रिंक ग्रुप हा भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता.

यानंतर, कोका-कोला देशातून बाहेर पडल्यानंतर, प्युअर ड्रिंक्सने स्वतःचा ब्रँड कॅम्पा कोला लाँच केला आणि लवकरच तो या क्षेत्रातील महत्वाचा ब्रँड बनला. त्याची 'द ग्रेट इंडियन टेस्ट' ही घोषणा त्यावेळी खूप लोकप्रिय होती, ज्याने आता जोरदार पुनरागमन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT