As movies disappoint, PVR Inox may screen T20 Cricket World Cup, concerts  Sakal
Personal Finance

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PVR Inox T20 Cricket World Cup: भारतातील सर्वात मोठा सिनेमा ऑपरेटर PVR आयनॉक्स प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी एक नवीन योजना आखत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने, ही चित्रपटगृहे ICC T20 विश्वचषकादरम्यान महत्त्वाचे सामने दाखवण्याचा विचार करत आहेत.

राहुल शेळके

PVR Inox T20 Cricket World Cup: भारतातील सर्वात मोठा सिनेमा ऑपरेटर PVR आयनॉक्स प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी एक नवीन योजना आखत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने, ही चित्रपटगृहे ICC T20 विश्वचषकादरम्यान महत्त्वाचे सामने दाखवण्याचा विचार करत आहेत.

कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नितीन सूद यांनी सांगितले की, कंपनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचे महत्त्वाचे सामने दाखवेल. भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले T20 क्रिकेट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकापेक्षा अधिक प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करेल, असा त्यांचा विश्वास आहे.

नुकसान झाल्यानंतर कंपनीने धोरण बदलले

प्रेक्षकांच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या पीव्हीआर आयनॉक्सने चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रेक्षकांना आणण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. सूद म्हणाले, तिमाही निकालात 130 कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे कंपनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता मैफिली, क्रीडा आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.

याशिवाय भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी के-पॉप परफॉर्मन्स आणण्यावरही विचार केला जात आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मार्च तिमाहीत तोटा कमी झाला असला तरी, चित्रपटाच्या प्रदर्शनात (निवडणुकीनंतर) विलंब हे अजूनही मंद वाढीचे कारण आहे.

स्ट्रीमिंग OTT प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता सिनेसृष्टीसाठी एक आव्हान आहे. Netflix, Amazon Prime आणि JioCinema सारख्या सेवा कमी किमतीत (प्रतिदिन एक रुपयापेक्षा कमी) चित्रपट आणि शो ऑफर करत आहेत.

चित्रपट स्क्रीन चेन प्रेक्षकांना परत आणण्यासाठी अनेक धोरणे अवलंबत आहेत. यामध्ये स्वस्त तिकिटांसाठी लॉयल्टी प्रोग्राम (पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट), जुन्या लोकप्रिय चित्रपटांचे पुन्हा प्रक्षेपण आणि चित्रपट महोत्सवांचे आयोजन यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT