Asirvad Microfinance IPO  Sakal
Personal Finance

Asirvad Microfinance IPO : असिर्वाद मायक्रो फायनान्सचा आयपीओ लवकरच, सेबीकडून ग्रीन सिग्नल...

सकाळ वृत्तसेवा

Asirvad Microfinance IPO : आयपीओमध्ये गुंतवणूक करुन अतिशय कमी काळात चांगला परतावा मिळवताना अनेक गुंतवणुकदार दिसून येतात. अशात तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची उत्तम संधी येत आहे.

एनबीएफसी मणप्पुरम फायनान्सची उपकंपनी असिर्वाद मायक्रो फायनान्सला (Asirvad Micro Finance) आयपीओद्वारे पैसे उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 4 ऑक्टोबर 2023 रोजी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली होती.

मायक्रो फायनान्स कंपनीच्या आयपीओमध्ये प्रति शेअर 10 रुपये फेस व्हॅल्यू ठेवण्यात आली आहे. 1500 कोटींचा हा फ्रेश इशूय आहे. कंपनीने सेबीकडे सादर केलेल्या डीआरएचपीमध्ये या आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर भविष्यातील व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवली आधार वाढवण्यासाठी करेल. सीर्वाद मायक्रो फायनान्स ही मणप्पुरम फायनान्सची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. जे कमी उत्पन्न असलेल्या महिला आणि बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या लोकांना सक्षम करण्याच्या प्रयत्नात मायक्रोफायनान्स कर्ज देते.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, कोटक महिन्द्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल ऍडव्हायजरी अँड सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे त्यांचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओचे रजिस्ट्रार आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT