Medicine Price Hike Sakal
Personal Finance

Medicine Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागण्याची शक्यता

Medicine Price Hike: राष्ट्रीय औषध प्राधिकरणाने 8 औषधांच्या 11 फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये 50% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या औषधांच्या निर्मिती खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राहुल शेळके

Medicine Price Hike: राष्ट्रीय औषध प्राधिकरणाने 8 औषधांच्या 11 फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये 50% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या औषधांच्या निर्मिती खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. औषध उत्पादकांकडून यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली असली तरी एपीआयने ती मान्य केलेली नाही. एपीआयने म्हटले आहे की, हे पाऊल उचलण्याचा उद्देश लोकांना ही औषधे सतत उपलब्ध करून देणे हा आहे.

औषधांच्या किमती वाढवण्याचा हा निर्णय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणासोबत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे. यापूर्वी 2019 आणि 2021 मध्ये देखील औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या होत्या.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) औषधांचे दर वाढवले ​​आहेत. यामध्ये दमा, टीबी, थॅलेसेमिया आणि मानसिक आरोग्याच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. ज्या फॉर्म्युलेशनच्या किमती वाढल्या आहेत त्यात Benzyl Penicillin 10 IU Injection; साल्बुटामोल गोळ्या 2 MGआणि 4 MG आणि रेस्पिरेटर सोल्यूशन 5 MG यांचा समावेश आहे.

तसेच सॅफ्ड्रोक्सिल टॅब्लेट 500 MG, एट्रोपिन इंजेक्शन 06.mg/ml, स्ट्रेप्टोमायसिन पावडर 750 MG आणि इंजेक्शन 1000 MG, डेस्फेरिओक्सामाइन 500 MG या औषधांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

अत्यावश्यक औषधांची यादी कशी तयार केली जाते?

आरोग्य मंत्रालय आवश्यक औषधांची यादी (NLEM) तयार करते. कॅन्सरविरोधी औषधे, अँटीबायोटिक्स, लस, सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करणाऱ्या निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) यांसह अनेक आवश्यक औषधे वेळोवेळी नवीन यादीमध्ये समाविष्ट केली जातात.

औषधांच्या किमती NPPA द्वारे निश्चित केल्या जातात आणि इतर औषधांच्या किमतींचे सातत्याने मूल्यांकन केले जाते. औषधाची कमाल किंमत निश्चित करण्यात आली असून, त्या आधारे कोणतीही कंपनी किंमत वाढवू शकत नाही, अशी तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT