मुंबई : म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार आता अधिक सजग झाल्याचे आढळत असून, जोखीम ओळखून सुरक्षित गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले असल्याचा निष्कर्ष अॅक्सिस म्युच्युअल फंडांने नोंदवला आहे.
अॅक्सिस फंडाच्या वतीने अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १७०० गुंतवणूकदारांनी भाग घेतला. काळजीपूर्वक गुंतवणूक करा, असा इशारा प्रत्येक कंपनी आपल्या गुंतवणूकदाराला देतच असते. मात्र, या गुंतवणूकदारांना यातील धोक्यांची किती माहिती आहे, याचा अंदाज घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात गुंतवणूकदार सजग होत असल्याचे पुढे आले.
या सर्वेक्षणातील निरीक्षणांनुसार, ५९ टक्के गुंतवणूकदार हे आजही कंपनीची आधीची कामगिरी पाहतात, तर अनेकदा बाजारात सुरू असलेल्या चर्चेचा त्यांच्या निर्णयावर परिणाम होतो. अॅम्फीच्या आकडेवारीनुसार, २२.२ टक्के इक्विटी गुंतवणूकदार हे वर्ष ते दोन वर्षांसाठी टिकून राहतात, तर ४८.७ टक्के गुंतवणूकदार हे वर्ष, दोन वर्षांच्या आत वेगळा पर्याय शोधतात.
८९ टक्के गुंतवणूकदार हे योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी धोका पत्करायला तयार असतात, तर केवळ २७ टक्के गुंतवणूकदार हे गुंतवणूक करण्यापूर्वी या जोखमीचा विचार करतात. ५३ टक्के गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंड निवडताना अशाप्रकारे चाचपणी करण्याबाबत फार विचार करत नाहीत.
प्रत्येक गुंतवणूकदाराची गरजदेखील वेगळी असते, आपली गरज ओळखून त्यांनीच योग्य त्या पर्यायाची निवड करणे गरजेचे आहे, असे मत अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार यांनी व्यक्त केले.
या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, गुंतवणूकदारांना जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन या संकल्पना समजून घेण्यात रस असल्याचे समोर आले आहे. ''रिस्क प्रोफाईलर'' म्हणजे जोखीम ओळखण्याचे साधन वापरून गुंतवणूक करणे अधिक सुलभ होते.
मात्र, केवळ ३० टक्के लोकांना याची माहिती असून, फक्त १२ टक्के गुंतवणूकदारच या पर्यायाचा वापर करतात असे आढळून आले आहे. ६४ टक्के लोकांना याची कल्पनाच नाही. त्याचप्रमाणे ६१ टक्के गुंतवणूकदारांना ''रिस्कोमीटर''चीही माहिती नाही.
केवळ १६ टक्के लोकांना याची माहिती असून, गुंतवणूक करण्यापूर्वी ते या पर्यायाची मदतही घेतात. ६६ टक्के लोकांनी रिस्कोमीटरची माहिती करून घेण्याची आणि गुंतवणुकीच्या निर्णयात याचे महत्त्व जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असे अॅक्सिस एएमसीचे सीआयओ आशिष गुप्ता यांनी सांगितले.
ठळक निष्कर्ष
योग्य म्युच्युअल फंड निवडीसाठी ८९ टक्के गुंतवणूकदार धोका पत्करायला तयार
गुंतवणूक करण्यापूर्वी २७ टक्के गुंतवणूकदार जोखमीचा विचार करतात
५९ टक्के गुंतवणूकदार कंपनीची आधीची कामगिरी पाहातात
'रिस्क प्रोफाईलर'चा वापर १२ टक्के गुंतवणूकदार करतात
६६ टक्के लोक रिस्कोमीटरची माहिती घेऊन गुंतवणुकीसाठी वापर करण्यासाठी उत्सुक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.