Ayodhya Ram Mandir ceremony SpiceJet launches special sale, fares, dates, and other details here  Sakal
Personal Finance

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला फक्त 1,622 रुपयांत हवाई प्रवास करण्याची संधी; इतके दिवस आहे ऑफर

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात आज दुपारी 12.30 वाजता (12.29 वाजता) श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पीएम मोदींनी रामलल्लाची आरती केली आणि प्रभू रामाच्या मूर्तीला नमस्कार केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी संतांचे आशीर्वाद घेतले.

राहुल शेळके

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात आज दुपारी 12.30 वाजता (12.29 वाजता) श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पीएम मोदींनी रामलल्लाची आरती केली आणि प्रभू रामाच्या मूर्तीला नमस्कार केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी संतांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी 11 दिवसांचा उपवास सोडला. पीएम मोदींशिवाय संघ प्रमुख मोहन भागवत, यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्याला उपस्थित होते.

या सोहळ्यानंतर आता सर्वांनाच रामाच्या दर्शनाची उत्सुकता लागली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी देशातील सर्व विमान कंपन्या व्यस्त आहेत. अनेक प्रकारच्या ऑफर्सही दिल्या जात आहेत. आता विमान कंपनीने मर्यादित कालावधीसाठी अयोध्येला स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर स्पाइसजेटकडून देण्यात आली आहे.

फक्त 1622 रुपयांमध्ये अयोध्येचा विमान प्रवास करता येणार ​​आहे. तिकिटांची विक्री आजपासून म्हणजेच 22 जानेवारीपासून सुरू झाली आहे. जी सुमारे आठवडाभर म्हणजे 28 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

या ऑफर अंतर्गत, प्रवास कालावधी 22 जानेवारी ते 28 जानेवारी ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तुम्ही या प्रवासाच्या कालावधीत 22 ते 28 जानेवारी दरम्यान कधीही तिकीट बुक करू शकता.

विमान कंपनीने सवलतीही जाहीर केल्या आहेत. कंपनी स्पाइसमॅक्सवर 30 टक्के सूटही देत ​​आहे. ही ऑफर मुंबई-गोवा, दिल्ली-जयपूर आणि गुवाहाटी-बागडोगरा या लोकप्रिय देशांतर्गत मार्गांवर देखील लागू केली जाऊ शकते.

1 फेब्रुवारीपासून देशातील अनेक शहरांमधून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय एअरलाइन्सने घेतला आहे. कंपनीने चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT