VICCO Chairman Yeshwant Pendharkar Sakal
Personal Finance

Yeshwant Pendharkar: विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन

राहुल शेळके

VICCO Chairman Yeshwant Pendharkar: आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन कंपनी विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. यशवंत 2016 मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले होते. दूरदर्शनवरील Vico 'Vico Turmeric, Nahi Cosmetic, Vico Turmeric आयुर्वेदिक क्रीम' आणि 'वज्रदंती, वज्रदंती विको वज्रदंती' यांसारख्या जिंगल्स लोकांना अजूनही आठवतात.

80 च्या दशकात टीव्ही जिंगल्सने देशभरात खळबळ उडवून दिली होती. विको आज खूप लोकप्रिय आहे, एकेकाळी त्याची उत्पादने घरोघरी विकली जायची. सुरुवातीला विकोची उत्पादने स्वयंपाकघरात बनवली जायची.

विको कंपनीचे पूर्ण नाव विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी आहे. विको कंपनीची सुरुवात 1952 मध्ये एका छोट्या घरात झाली. पहिले आयुर्वेदिक उत्पादन ‘विको वज्रदंती टूथ पावडर’ तयार करण्यात आले. या उत्पादनात असा दावा करण्यात आला होता की ते 18 औषधी वनस्पतींनी बनलेले आहे.

कंपनी लोकांच्या घरी जाऊन त्यांचे उत्पादन विकत असे. त्यांच्या मेहनतीला लवकरच फळ मिळाले आणि कंपनी सुरू केल्याच्या तीन वर्षातच त्यांनी मोठे यश मिळवले. 1955 पर्यंत कंपनीची उलाढाल 10 लाख होती. परळच्या एका छोट्या गोदामात सुरू झालेल्या या कंपनीचे लवकरच मोठ्या कारखान्यात रूपांतर झाले.

केशव विष्णू पेंढारकर यांनी ही कंपनी सुरू केली. नागपुरातील एका छोट्याशा परिसरात ते रेशन दुकान चालवत असे. केशव यांनी काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि कुटुंबासह मुंबई गाठली. त्यांनी पाहिलं की लोक भरपूर ॲलोपॅथिक औषधे आणि पॉन्ड्स, निव्हिया, अफगाण स्नो यांसारखी विदेशी कॉस्मेटिक उत्पादने वापरतात. येथूनच त्यांना विको कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT