UK Global Investors Summit 2023: पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव येत्या काही दिवसांत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गुंतवणुकीमुळे हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. बाबा रामदेव म्हणाले की, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत मोठ्या संधी आहेत.
मी सर्व कंपन्यांना त्यांचे CSR वापरून येथे शाळा बांधण्यासाठी आवाहन करेन. डेहराडून विमानतळ 24 तास सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे उद्योगपतींना अधिक फायदा होईल असे त्यांनी सांगितले.
बाबा रामदेव शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 मध्ये सहभागी झाले होते. ही शिखर परिषद आज 8 डिसेंबरपासून सुरू झाली असून 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
अदानी समुहाचे संचालक प्रणव अदानी, JSW MD सज्जन जिंदाल, ITC MD संजीव पुरी, Emaar India CEO कल्याण चक्रवर्ती, TVS सप्लाय चेन सोल्युशन्सचे अध्यक्ष आर. दिनेश हे उद्याेगपती या समिटमध्ये सहभागी होणार आहेत.
पतंजली 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार
बाबा रामदेव म्हणाले की, आतापर्यंत आम्ही उत्तराखंडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पतंजली 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून 10 हजार लोकांना रोजगार देणार आहे. मी सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना आवाहन करतो की, उत्तराखंडमध्येही त्यांचे एक कॉर्पोरेट घर बांधावे.
समिटमध्ये सज्जन जिंदाल यांनी राज्यात 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. धार्मिक स्थळांचा विकास सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, TVS सप्लाय चेनचे आर दिनेश यांनी राज्यातील प्लांटच्या विस्ताराची घोषणा केली. त्यांनी सांगितले की त्यांची कंपनी राज्यात गुंतवणूक वाढवेल, ज्यामुळे 7 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.