Sheikh Hasina Networth: बांगलादेशातील वाढती निदर्शने आणि त्यांच्या सुरक्षेला वाढता धोका यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. नुकत्याच झालेल्या गदारोळानंतर हसीना यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत जगभरात चर्चा रंगली आहे.
2009 पासून पंतप्रधानपद भूषवणाऱ्या हसिना यांच्या नावावर सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. हसीना यांच्या घरी काम करणाऱ्या जहांगीर आलम या नोकराकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. तो सध्या अमेरिकेत राहतो.
या खुलाशानंतर हसिना यांनी आलमच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. आलमची मालमत्ता आणि हसीनाची एकूण संपत्ती यातील प्रचंड तफावतीने त्यांच्या स्वत:च्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
बांगलादेशातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हसीना यांनी निवडणूक आयोगासमोर आपली संपत्ती जाहीर केली होती. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 3.14 कोटी रुपये (4.36 कोटी बांगलादेशी चलन) आहे.
हसीना यांचे उत्पन्न प्रामुख्याने शेतीतून येते, ज्यात 6 एकर शेती आणि मत्स्यपालन यांचा समावेश होतो. याशिवाय त्यांच्याकडे एक कार देखील आहे जी त्यांना गिफ्ट करण्यात आली आहे. हसीना यांना त्यांच्या कार्यकाळात 9,92,922 रुपये वार्षिक पगार मिळाला होता.
शेख हसीना यांची संपत्ती खूप जास्त आहे. हसीना या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. अहवालानुसार, त्यांचा वार्षिक पगार अंदाजे 86,000 रुपयांच्या समतुल्य आहे. मात्र, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत त्यांच्या पगारापेक्षा वेगळा आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शेख हसीना यांची एकूण संपत्ती 4.36 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. 2022 मध्ये त्यांचे उत्पन्न 1.07 कोटी रुपये होते, ज्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जास्त होता. ही रक्कम त्यांच्या 2018 मधील उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे.
शेख हसीना यांच्या आयकर विवरणपत्रात एकूण उत्पन्न 1.91 कोटी रुपये आहे. 75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आणि बचत रोख्यांसह त्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे त्यांची आर्थिक सुधारली आहे.
शेख हसीना यांना त्यांचे वडील मुजीबर रहमान, देशाच्या प्रमुख व्यक्तींपैकी एक, यांची संसाधने आणि मालमत्ता वारशाने मिळाल्याचे सांगितले जाते. त्यांनी कृषी क्षेत्रातून अतिरिक्त संपत्ती कमावली असल्याचे म्हटले जाते.
याशिवाय सिंगापूरच्या सिटी स्पेसमध्येही त्यांचे अपार्टमेंट आहेत. त्यांचे शासकीय निवासस्थान 'गणभवन' आंदोलकांनी पेटवून दिले. माजी पंतप्रधानांच्या उर्वरित आलिशान घरांमध्ये आंदोलकांनी प्रवेश केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.