Bank holidays in August 2024 Sakal
Personal Finance

Bank holidays August: ऑगस्टमध्ये बँकांना सर्वात जास्त सुट्ट्या; RBIने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

राहुल शेळके

Bank holidays in August 2024: आता जुलै महिना संपत आला आहे आणि ऑगस्ट महिना येणार आहे. ऑगस्टपासून देशात सणांचा हंगामही सुरू होत आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. जर तुम्ही पुढच्या महिन्यात काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर ही यादी नक्की पहा. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात.

बँक सुट्ट्यांची यादी

  • 3 ऑगस्ट : आगरतळामध्ये केर पूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत

  • 4 ऑगस्ट: रविवार

  • 8 ऑगस्ट: तेंडोंग लो रम फाट्यानिमित्त गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.

  • 10 ऑगस्ट : दुसरा शनिवार

  • 11 ऑगस्ट: रविवार

  • 13 ऑगस्ट : देशभक्त दिनानिमित्त इंफाळमध्ये बँका बंद राहणार आहेत.

  • 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

  • 18 ऑगस्ट : रविवार

  • 19 ऑगस्ट : रक्षाबंधन

  • 20 ऑगस्ट : श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त केरळमध्ये बँका बंद राहणार आहेत.

  • 24 ऑगस्ट : चौथा शनिवार

  • 25 ऑगस्ट : रविवार

  • 26 ऑगस्ट: श्रीकृष्ण जन्मोत्सव

बँक सुट्ट्यांची यादी कोठे तपासायची?

ऑगस्टमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे सहा दिवस सुट्या आहेत, तर देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या सणांमुळे बँका बंद राहणार आहेत.

बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाईटवर बँक सुट्ट्या देखील पाहू शकता. यासाठी तुम्ही https://www.rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकला भेट देऊ शकता.

बँकांमध्ये सततच्या सुट्ट्यांमुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, मात्र बँकेच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही एटीएमचा वापर रोख रक्कम काढण्यासाठी करू शकता. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकता. नेट बँकिंग सुविधा 24X7 सुरु असते. तसेच बँकेच्या वेबसाइट किंवा ॲपद्वारे ऑनलाइन बँकिंगद्वारे बँकिंगचे काम सहज करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT