RBI  Sakal
Personal Finance

Banking Fraud: एका वर्षात 13 हजार बँक खात्यांमधून पैसे गायब, RBIने धक्कादायक आकडेवारी केली जाहीर

बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणुक होत आहे.

राहुल शेळके

 RBI Report: बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणुक होत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या 13,530 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे, तर यात गुंतलेली रक्कम आता जवळपास निम्मी होऊन 30,252 कोटी रुपयांवर आली आहे.

आरबीआयच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात डिजिटल पेमेंटद्वारे सर्वाधिक फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. कार्ड/इंटरनेटमधून फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली. कर्जाच्या पोर्टफोलिओ बाबतीतही फसवणूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

किती प्रकरणे नोंदवली गेली?

2021-22 मध्ये एकूण 9,097 फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये 59,819 कोटींचा समावेश होता. तर 2020-21 मध्ये 1,32,389 कोटी रुपयांच्या फसवणुकीची 7,338 प्रकरणे समोर आली आहेत. असे आरबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे

तीन वर्षात नोंदवलेल्या 1 लाख आणि त्याहून अधिकच्या फसवणुकीच्या संदर्भात, RBI डेटा 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये एकूण फसवणुकीच्या रकमेत 55 टक्के घट झाली आहे.

RBI ने म्हटले आहे की खाजगी क्षेत्रातील बँकांद्वारे नोंदवलेल्या फसवणुकीच्या संख्येत कार्ड/इंटरनेट इत्यादीसारख्या छोट्या किंमतीची फसवणूक अधिक आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्जाशी संबंधित फसवणुकीची प्रकरणे अधिक आहेत.

मध्यवर्ती बँकेने असेही निदर्शनास आणून दिले की 2021-22 आणि 2022-23 दरम्यान नोंदवलेल्या फसवणुकीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की फसवणूक झाल्याची तारीख आणि तपास यात बरेच अंतर आहे.

2022-23 दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 21,125 कोटी रुपयांची 3,405 फसवणूक केली आहे. खाजगी बँकांनी 8,932 प्रकरणे नोंदवली आहेत ज्यात 8,727 कोटी रुपयांचा समावेश आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एकूण 30,252 कोटी रुपयांपैकी 95 टक्के किंवा 28,792 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणांची नोंद झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT