Banks to remain closed for up to 5 days on Christmas in these states check out the full list  Sakal
Personal Finance

Bank Holiday: ख्रिसमसनिमित्त बँका सलग 5 दिवस राहणार बंद? पहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in December, 2023: शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही यात समावेश आहे.

राहुल शेळके

Bank Holidays in December, 2023: डिसेंबरमध्ये ख्रिसमस असल्याने देशभरातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत. सेंट्रल रिझव्‍‌र्ह बँकेच्या बँक हॉलिडे लिस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या आहेत, त्यामुळे बँका अनेक दिवस बंद राहू शकतात आणि शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश आहे.

ख्रिसमसला बँका किती दिवस बंद राहतील?

यावेळी 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसचा दिवस सोमवारी येत आहे. याआधी 23 डिसेंबरला शनिवार आणि 24 डिसेंबरला रविवार आहे. आणि 23 डिसेंबर हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने या शनिवारी बँका बंद राहतील, म्हणजे सलग तीन दिवस सुट्टी असेल.

यासोबतच 26 आणि 27 डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरू असणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये 27 तारखेपर्यंत सुट्टी असेल. म्हणजे एकूण पाच दिवसांची सुट्टी असणार आहे.

5 दिवस सुट्टी असेल का?

अनेक शहरांमध्ये 25 तारखेला ख्रिसमसची सुट्टी आहे, म्हणजेच बँका फक्त 3 दिवस बंद राहतील. पण काही शहरे आणि राज्यांमध्ये 5 दिवस सुट्ट्या आहेत.

आरबीआयच्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, डिसेंबरमध्ये देशात 18 दिवस अधिकृत बँक सुट्ट्या होत्या, ज्यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. उरलेल्या महिन्यातील सुट्ट्या बघितल्या तर-

  • 23 डिसेंबर- चौथा शनिवार

  • 24 डिसेंबर - रविवार

  • 25 डिसेंबर 2023- ख्रिसमस

  • 26 डिसेंबर 2023- ख्रिसमस सेलिब्रेशन

  • 27 डिसेंबर आणि 30 डिसेंबर - ख्रिसमस आणि यू कियांग नांगबाह

  • 31 डिसेंबर- रविवार

ऑनलाइन बँकिंग सुविधा चालू राहणार

या कालावधीत सर्व ऑनलाइन बँकिंग सुविधा चालू राहणार आहेत. तुम्ही तुमचे बहुतांश काम मोबाईल बँकिंगद्वारे पूर्ण करू शकाल. पण तुमचे बँकांशी संबंधीत कागदपत्रांचे काही काम असेल तर तुम्ही तुमचे नियोजन सुट्ट्यांची यादी पाहूनच करावे, जेणेकरून तुमचे काम वेळेत पूर्ण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT