Bengaluru entrepreneurs are too decent use strong words against govt FM Nirmala Sitharaman  Sakal
Personal Finance

Nirmala Sitharaman: "मुंबई सारखं नाही! बेंगळुरूमधील उद्योजक खूप सभ्य अन् शांत" अर्थमंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ

Nirmala Sitharaman: 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींशी, विशेषत: फिनटेक कंपन्यांशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. सर्व कंपन्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

राहुल शेळके

Nirmala Sitharaman: 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींशी, विशेषत: फिनटेक कंपन्यांशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. सर्व कंपन्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की फिनटेक क्षेत्रातील काही स्टार्टअपच्या समस्यांना संपूर्ण क्षेत्राची समस्या म्हणून पाहिले जाऊ नये. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या की, सरकार पूर्णपणे स्टार्टअप्सच्या पाठीशी उभे आहे आणि या कंपन्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.

सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक फिनटेक आणि नॉन-फिनटेक उद्योजक सहभागी झाले होते. सुमारे एक महिन्यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. फिनटेक नियमांच्या समस्यांमुळे मध्यवर्ती बँकेने हे निर्बंध जाहीर केले होते.

यानंतर स्टार्टअप्सच्या संस्थापकांच्या एका समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर लादलेल्या निर्बंधांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

सीतारामन म्हणाल्या की, 'मला या क्षेत्राबद्दल पूर्ण सहानुभूती आहे आणि एक, दोन किंवा चार स्टार्टअपच्या समस्या आहेत याचा अर्थ संपूर्ण स्टार्टअप जगाची ती समस्या आहे म्हणून पाहिले जाऊ नये. असे अनेक स्टार्टअप चांगले काम करत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्ली आणि मुंबईतील उद्योजकांच्या तुलनेत बेंगळुरूमधील उद्योजक खूप सभ्य आणि शांत वाटतात. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या की बेंगळुरूमधील उद्योजक फक्त सोशल मीडियावर सरकारसाठी कठोर शब्द वापरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT