BharatPe: भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने BharatPeला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कंपनी कायद्याच्या कलम 206 अंतर्गत पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकारने कंपनीकडून कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवरवर केलेल्या कायदेशीर कारवाईबद्दल माहिती मागवली आहे.
कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने कंपनीकडून अश्नीर ग्रोवरविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याबाबात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांबाबत माहिती मागवली आहे. BharatPe कंपनी 2022 मध्ये अडचणीत सापडली होती.
जेव्हा कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी कोटक ग्रुपच्या कर्मचाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आणि त्याला धमकावले. अशनीर ग्रोव्हरने कोटक ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याला नायकाचा आयपीओ दिला नाही म्हणून धमकावले होते.
वादानंतर, अश्नीर ग्रोव्हरने BharatPe च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला होता आणि कंपनीने आपल्या आर्थिक खात्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता.
नोटीसवर, भारतपे कंपनीने उत्तर दिले आहे की मंत्रालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे आणि अश्नीर प्रकरणात अधिक माहिती मागवली आहे. कंपनीने सांगितले की, आम्ही तपास यंत्रणांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करू.
ऑडिटनंतर, भारतपेने अश्नीर ग्रोवर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या भावाविरुद्ध निधीचा गैरवापर आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अश्नीर आणि त्यांच्या पत्नीमुळे कंपनीला 88.67 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला होता.
कंपनीने नुकसान भरपाईसाठी गुन्हा दाखल केला होता. मात्र, अश्नीरने स्वत:वर आणि पत्नीवरील आरोप फेटाळून लावले होते. भारतपे टेक्नॉलॉजीमध्ये अश्नीर ग्रोव्हरचे कोणतेही योगदान नसल्याचा आरोपही कंपनीने केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.