CAMS Sakal
Personal Finance

स्मार्ट गुंतवणूक : कॅम्स (शुक्रवारचा बंद भाव रु. २८३३)

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात ‘कॅम्स’ ही भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजन्सी म्हणून कामकाज करणारी अग्रेसर कंपनी आहे.

भूषण गोडबोले

कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात ‘कॅम्स’ ही भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजन्सी म्हणून कामकाज करणारी अग्रेसर कंपनी आहे. या कंपनीने या कार्यक्षेत्रात जवळपास ६९ टक्के बाजारहिस्सा काबीज केला असल्याने म्युच्युअल फंड व्यवसायासाठी ‘कॅम्स’ ही सर्वांत मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट म्हणून कार्यरत आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे व्यवस्थापित केलेली मालमत्ता जितकी जास्त असेल, तितका या कंपनीला जास्त महसूल मिळू शकतो. या कंपनीकडे २५ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या सुमारे २८० सेवा केंद्रांचा समावेश असलेले पॅन-इंडिया नेटवर्क आहे.

म्युच्युअल फंड सेवा व्यवसायातील अनेक प्रमुख कंपन्या या कंपनीच्या सेवांचा लाभ घेत आहेत. कंपनीच्या इतर सेवांमध्ये अकाउंट्स ॲग्रीगेटर, पेमेंट्स ॲग्रीगेटर (कॅम्सपे), पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (पीएमएस) आणि पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ); तसेच म्युच्युअल फंड कंपन्यांना आवश्यक तंत्रज्ञान-सक्षम सेवा, नॅशनल पेन्शन स्कीमसाठी (एनपीएस) सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्स, विमा भांडार आणि ई-केवायसी आदींचा समावेश होतो.

दीर्घावधीमध्ये भारतात म्युच्युअल फंड उद्योगात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे. याचा फायदा या कंपनीस होणे अपेक्षित आहे. अर्थात, उत्पन्नावरील नियमनाबाबतीत भविष्यात कोणताही बदल झाल्यास कंपनीच्या मिळकतीवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

गुंतविलेल्या भांडवलावर कंपनी दरवर्षी सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे. तिमाही निकालानुसार, कंपनीने वार्षिक आधारावर महसूलवाढीसह रु. ८१ कोटी नफा कमविला आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये रु. ४०६७ चा उच्चांक नोंदविल्यानांतर मार्च २०२३ पर्यंत या शेअरने रु. २०१० पर्यंत घसरण दर्शविली. यानंतर आलेखानुसार, शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला. गेल्या आठवड्यात रु. २६९० या पातळीच्या वर रु. २८३३ ला बंद भाव देऊन या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्ये चढ-उतार दर्शविणाऱ्या अवस्थेमधून बाहेर पडत तेजीचे संकेत दिले आहेत.

दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, या कंपनीच्या शेअरमध्ये जोखीम लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

(डिस्क्लेमर - या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना शेअर बाजारातील जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT