Bhutan Bitcoin Holdings Sakal
Personal Finance

Bhutan: हॅप्पी कंट्रीमध्ये बिटकॉइनची हवा! भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश

राहुल शेळके

Bhutan Fourth-Largest Government Bitcoin Holdings: गेल्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. काही देशांच्या सरकारांनी या मार्केटमधील सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्येही गुंतवणूक केली आहे. भारताचा शेजारी देश भूतानचाही यामध्ये समावेश आहे. भूतान सरकारकडे 13,000 पेक्षा जास्त बिटकॉइन्स आहेत. या बिटकॉइन्सचे मूल्य 750 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे.

CoinGeckoच्या डेटानुसार, भूतानशी जोडलेल्या क्रिप्टो वॉलेटमध्ये सुमारे 1.5 दशलक्ष डॉलर किमतीचे 650 हून अधिक इथरियम देखील आहेत. बिटकॉइनचा साठा असणारा सर्वात मोठा देश अमेरिका आहे. यूएसएमध्ये 2,13,240 पेक्षा जास्त बिटकॉइन्स आहेत.

त्यापाठोपाठ 1,90,000 बिटकॉइन्ससह चीनचा क्रमांक लागतो. या यादीत ब्रिटन (सुमारे 61,000  बिटकॉइन्स) तिसऱ्या स्थानावर आहे. बिटकॉइनचा साठा असलेल्या देशांमध्ये भूतान चौथ्या क्रमांकावर आहे.

अलिकडच्या वर्षांत, भारतातही क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. जास्त कर असूनही, देशात क्रिप्टोकरन्सीमध्ये रस वाढत आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीत भारताची वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांत, नियामकांनी या विभागातील काही कंपन्यांवर कठोर कारवाई देखील केली आहे.

ब्लॉकचेन ॲनालिटिक्स फर्म चैनॅलिसिसने एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी जून ते या वर्षी जुलै दरम्यान, देशात केंद्रीकृत एक्सचेंज आणि विकेंद्रित वित्त मालमत्तेचा वापर वाढला आहे. केंद्र सरकारने क्रिप्टो सेगमेंटविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

गेल्या वर्षीच्या अखेरीस, नियमांचे पालन न केल्याबद्दल फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने (FIU) नऊ ऑफशोर क्रिप्टो एक्सचेंजेसना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असे असूनही भारतातील क्रिप्टोकरन्सीमध्ये वाढ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT