Big drop in gold demand due to rising price; Demand is estimated at 700 to 800 MT  Sakal
Personal Finance

Gold Price: वाढत्या भावामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट; मागणी ७०० ते ८०० मेट्रिक टन होण्याचा अंदाज

Gold Price: जगातील दुसरा सर्वांत मोठा सोन्याचा आयातदार असलेल्या भारतात वाढत्या भावामुळे चालू वर्षात सोन्याची मागणी चार वर्षांतील सर्वांत कमी होईल, असा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने वर्तवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: जगातील दुसरा सर्वांत मोठा सोन्याचा आयातदार असलेल्या भारतात वाढत्या भावामुळे चालू वर्षात सोन्याची मागणी चार वर्षांतील सर्वांत कमी होईल, असा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने वर्तवला आहे.

३१ मार्च २०२४ अखेरच्या तिमाहीत सोन्याची मागणी एक वर्षापूर्वीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढली असली, तरी सध्या सोन्याचा भाव प्रचंड वाढला असल्याने मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भारतातून वर्ष २०२४ मध्ये सोन्याची एकूण मागणी ७०० ते ८०० मेट्रिक टन दरम्यान राहू शकते. भाव आणखी वाढत राहीले, तर ही मागणीदेखील आणखी कमी होईल आणि एकूण वापर चार वर्षांतील सर्वात कमी होण्याची शक्यता आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी सांगितले.

चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या भारतात वर्ष २०२३ मध्ये सोन्याचा वापर ७६१ टन झाला असून, त्यात वार्षिक १.७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचे भाव महिन्यात प्रति दहा ग्रॅम ७३,९५८ रुपये विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सोन्याच्या भावात १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये त्यात दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती.

सोन्याचे भाव वाढल्याने गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळत आहे, त्यामुळे गुंतवणुकीच्यादृष्टीने मागणीला चालना मिळत आहे. जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीत सोन्याचा वापर आठ टक्क्यांनी वाढून १३६.६ टन झाला.

या तिमाहीत गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी १९ टक्क्यांनी, तर दागिन्यांची मागणी चार टक्क्यांनी वाढली, असेही या अहवालात म्हटले आहे. मार्च तिमाहीत, जुन्या सोन्याचा पुरवठा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढून ३८.३ टनांवर पोहोचला.

हा दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक आहे. भावातील तेजीने काही गुंतवणूकदारांनी सोने विक्री केल्याने जुन्या सोन्याचा पुरवठा वाढला, असेही जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. मार्च तिमाहीत रिझर्व्ह बँकेने १९ टन सोन्याची खरेदी केली असून, गेल्या वर्षी बँकेने १६ टन सोने खरेदी केले होते, असेही अहवालात म्हटले आहे.

सणासुदीलाही मागणी कमी

भारतात सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु, एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरही सोन्याची मागणी कमी होती. भाव विक्रमी उच्चांकावर गेल्यामुळे मागणीवर परिणाम झाला. आता अक्षय तृतीया आणि जैन पवित्र सणाच्या वेळी मागणी मध्यम असू शकते, असे सचिन जैन म्हणाले.

अहवालातील ठळक मुद्दे

  • वर्ष २०२४ मध्ये सोन्याची एकूण मागणी ७०० ते ८०० मेट्रिक टन

  • मार्च २०२४ तिमाहीत मागणीत वार्षिक आठ टक्क्यांनी वाढ

  • वर्ष २०२३ मध्ये सोन्याचा वापर ७६१ टन

  • आर्थिक वर्ष २४ मध्ये भावात १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ

  • आर्थिक वर्ष २३ मध्ये भावात दहा टक्क्यांनी वाढ

  • मार्च तिमाहीत गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी १९ टक्क्यांनी, तर दागिन्यांसाठी चार टक्क्यांनी वधारली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT