bill gates get fan of dolly chaiwala video viral on social media know his story Sakal
Personal Finance

Dolly Chaiwala: चहाचा लागला नाद अन् शाळा सोडली, बिल गेट्स ज्याचा फॅन झालाय तो डॉली चायवाला किती रुपये कमवतो?

Who is Dolly Chaiwala: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारताच्या संस्कृतीबद्दल त्यांनी अनेक वेळा मत व्यक्त केले आहे. परंतु यावेळी ते प्रसिद्ध डॉली चाय विक्रेत्याच्या शैलीने खूप प्रभावित झाले. चहाच्या स्टॉलवर बिल गेट्स म्हणाले- 'कृपया एक चहा द्या' बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राहुल शेळके

Who is Dolly Chaiwala: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारताच्या संस्कृतीबद्दल त्यांनी अनेक वेळा मत व्यक्त केले आहे. परंतु यावेळी ते प्रसिद्ध डॉली चाय विक्रेत्याच्या शैलीने खूप प्रभावित झाले. चहाच्या स्टॉलवर बिल गेट्स म्हणाले- 'कृपया एक चहा द्या' बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, 'भारतात तुम्हाला सर्वत्र नावीन्य दिसेल, अगदी साधा चहा बनवण्यातही.' (Bill Gates get fan of Dolly Chaiwala)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स जेव्हा जेव्हा भारताला भेट देतात तेव्हा ते काही व्हिडिओ शेअर करतात जे काही सेकंदात व्हायरल होतात. यावेळी बिल गेट्स भारतात आले तेव्हा त्यांनी डॉली चाय विक्रेत्यासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते आधी 'वन टी प्लीज' म्हणतात आणि मग चहा बनवण्याचा व्हिडिओ सुरू होतो.

नागपूरमध्ये डॉली चहावाल्याची वेगळी ओळख आहे. या व्यक्तीने 10वी नंतर शिक्षण सोडले आणि गेल्या 16 वर्षांपासून नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान चालवत आहे. त्याचे खरे नाव सुनील पाटील आहे.

डॉलीच्या चहाच्या स्टॉलवर जो कोणी चहा प्यायला येतो तो त्याच्या स्टाइल आणि चवीचा चाहता होतो. सकाळी 6 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्याचा स्टॉल सुरु असतो. डॉली चहाची किंमत सात रुपये आहे. दिवसाला तो 350 ते 500 कप चहा विकतो. त्याची दिवसाची कमाई जवळपास 3,500 रुपये आहे.

डॉली स्टॉलवर रजनीकांतच्या स्टाईलमध्ये ग्राहकांना चहा देतो. एवढेच नाही तर डॉली ग्राहकांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करतो. खुद्द बिल गेट्सही डॉलीच्या स्टाइलच्या प्रेमात पडले होते.

डॉली या छोट्या चहाच्या स्टॉलमधून चांगली कमाई करतो. डॉलीच्या अनोख्या शैलीने आणि चवीने अनेक सेलिब्रिटी प्रभावित झाले आहेत. सोशल मीडियावर डॉली चायवालाची बरीच चर्चा यामुळे चालू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT