Hinduja Family Net Worth Sakal
Personal Finance

Hinduja Family: ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना शिक्षा; किती आहे संपत्ती?

राहुल शेळके

Hinduja Group: स्वित्झर्लंडमधील एका न्यायालयाने ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना नोकरांचा गैरवापर आणि शोषण केल्याप्रकरणी साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने हिंदुजा कुटुंबाची मानवी तस्करीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, न्यायालयाने प्रकाश आणि कमल हिंदुजा यांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर अजय आणि नम्रता हिंदुजा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

यासह, न्यायालयाने हिंदुजा कुटुंबाला 9,50,000 डॉलरची भरपाई आणि 300,000 डॉलर प्रक्रिया शुल्क भरण्याचे निर्देश दिले, हे प्रकरण हिंदुजा कुटुंबाच्या जिनेव्हा येथील बंगल्याशी संबंधित आहे.

16 तासांपेक्षा जास्त काम केल्याचा आरोप

फिर्यादींनी हिंदुजा कुटुंबातील चार सदस्य - प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी कमल हिंदुजा, त्यांचा मुलगा अजय हिंदुजा आणि त्यांची सून नम्रता हिंदुजा यांच्यावर मानवी तस्करी आणि भारतातील कामगारांचे शोषण केल्याचा आरोप केला होता.

कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त केल्याचा आणि त्यांच्या बंगल्यात ओव्हरटाईम वेतनाशिवाय त्यांना दिवसातून 16 तास किंवा त्याहून अधिक तास काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप कुटुंबीयांवर होता.

हिंदुजा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले होते. या कुटुंबाशी संबंधित व्यावसायिक सल्लागार नजीब झियाजी यांनाही आरोपी करण्यात आले आणि ते शोषणात सामील असल्याचे आढळून आले.

हिंदूजा कुटुंबातील सदस्यांचे प्रतिनिधीत्व करणारे वकील रोमेन जॉर्डन यांनी ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे मी निराश झालो असून त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केली आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे.

कोण आहे हिंदुजा परिवार?

परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी 1914 मध्ये सिंध प्रदेशात कमोडिटी-व्यापार व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांच्या चार मुलांनी (श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद हिंदुजा, प्रकाश आणि अशोक हिंदुजा) हा व्यवसाय मोठा केला आणि त्याचा विस्तार केला.

बॉलीवूड चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरण करण्यातही त्यांना सुरुवातीला यश मिळाले. परमानंद दीपचंद हिंदुजा, ज्येष्ठ पुत्र श्रीचंद हिंदुजा यांचे 2023 मध्ये निधन झाले. तिन्ही धाकटे भाऊ आणि श्रीचंद आणि त्यांची मुलगी विनू यांच्यात कौटुंबिक मालमत्तेवरून अनेक वाद झाले, पण 2022 मध्ये त्यांनी आपापसातील मतभेद मिटवले.

हिंदुजा परिवाराकडे किती संपत्ती?

हिंदुजा कुटुंब वित्त, माध्यम आणि ऊर्जा क्षेत्रात सक्रिय आहे आणि सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या सहा भारतीय कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. त्यांची सामूहिक संपत्ती किमान 14 अब्ज डॉलर आहे, ज्यामुळे ते आशियातील 20 श्रीमंत कुटुंबांमध्ये आहेत.

प्रकाश हिंदुजा आणि त्यांचे भाऊ माहिती तंत्रज्ञान, मीडिया, पॉवर, रिअल इस्टेट आणि हेल्थकेअर क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. फोर्ब्सचा अंदाज आहे की हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 20 अब्ज डॉलर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT