Blackstone, Abu Dhabi Investment, GIC submit bid to buy into Haldiram Snacks Food  Sakal
Personal Finance

Haldiram: तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड लवकरच परदेशी कंपनीच्या हातात जाणार? सर्वात मोठ्या कंपनीने लावली बोली

राहुल शेळके

Haldiram Namkeen: कोट्यवधी भारतीयांची आवडती कंपनी हल्दीराम लवकरच परदेशी कंपनीच्या हातात जाऊ शकते. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि GIC सिंगापूरसह जगातील सर्वात मोठी खाजगी इक्विटी फर्म, ब्लॅकस्टोन हल्दीराममधील हिस्सा विकत घेणार आहे.

गेल्या आठवड्याच्या अखेरीस, ब्लॅकस्टोनने हल्दीराम स्नॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेड (HSFPL) मधील हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

87 वर्षाची हल्दीराम ही भारतातील सर्वात मोठी स्नॅक्स आणि सुविधा देणारी कंपनी आहे. ब्लॅकस्टोन आणि त्याच्या भागीदारांना हल्दीराममधील 74 ते 76% हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे. त्याचे मूल्य 8-8.5 अब्ज डॉलर्स (66,400-70,500 कोटी) ठेवले आहे.

ADIA आणि GIC दोघेही Blackstone च्या जागतिक निधीचे मर्यादित भागीदार किंवा प्रायोजक आहेत. जर हा करार झाला तर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा खाजगी इक्विटी करार असेल.

100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे

गंगा बिसन अग्रवाल यांनी 1937 मध्ये हल्दीराम ब्रँड सुरू केला. आज कंपनीचा 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे. हल्दीराम सुमारे 400 प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करतात.

यामध्ये स्नॅक्स, नमकीन, मिठाई, फ्रोझन फूड, बिस्किटे, रेडी टू ड्रिंक बेव्हरेजेस, पास्ता, कन्फेक्शनरी आणि रेडी टू इट फूड यांचा समावेश आहे. कंपनी आपली उत्पादने अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये निर्यात करते.

ब्लॅकस्टोनचा भारतातील सर्वात मोठा हिस्सा?

ब्लॅकस्टोनने दिलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ब्लॅकस्टोनची भारतातील सर्वात मोठी खरेदी असेल. मात्र, या संपूर्ण प्रकरणी आतापर्यंत कोणत्याही कंपनीकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही. हल्दीरामच्या नागपूर आणि दिल्लीतील व्यवसायांच्या विलीनीकरणावर या कराराचे यश अवलंबून असेल. विलीनीकरणाला सीसीआयने एप्रिलमध्ये आधीच मान्यता दिली आहे. ब्लॅकस्टोन या डीलबद्दल खूप उत्सुक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT