Titagarh Rail Systems Ltd : टिटागढ रेल सिस्टीम्सच्या (Titagarh Rail) शेअर्समध्ये बुधवारी अर्थात 26 जूनला मोठी ब्लॉक डील दिसली. ब्लॅकरॉक ग्लोबल इमर्जिंग मार्केट्स फंड इंकने (BlackRock Global Emerging Markets Fund Inc.) कंपनीत गुंतवणूक केली आहे. ब्लॅकरॉकने 153.12 कोटीना 9.46 लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केले आहेत.
खरेदी किंमत 1618 रुपये प्रति शेअर होती, जी मंगळवारी बीएसईवरील शेअरच्या बंद किंमतीइतकी आहे. ब्लॉक डीलमुळे, टिटागढच्या शेअर्समध्ये बुधवारी 12 टक्क्यांनी वाढ झाली आणि स्टॉक 1815.05 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. कंपनीचे शेअर्स 9.19 टक्क्यांनी वाढून 1,766.90 रुपये झाले.
बीएसईवर उपलब्ध बल्क डील डेटा डेटानुसार, रश्मी चौधरीने 1618 रुपयांच्या किंमतीला 26.93 लाख पेक्षा जास्त शेअर्स विकले. या डीलमधून त्यांना सुमारे 436 कोटी रुपये मिळाले. चौधरी हे रेल्वे क्षेत्रातील या कंपनीचे प्रमोटर आहेत.
एनएसईवर उपलब्ध शेअरहोल्डिंग डेटानुसार, मार्च तिमाहीपर्यंत त्यांच्याकडे 1.28 कोटी पेक्षा जास्त शेअर्स होते, जे कंपनीतील 9.52% स्टेकच्या समान आहेत. गेल्या एका महिन्यात या शेअरने 41 टक्के मजबूत परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 70 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 262 टक्के परतावा मिळाला आहे.
इतकेच नाही तर गेल्या 4 वर्षात 4891 टक्के बंपर नफा कमावला आहे. टीटागढ एक मोबिलिटी सोल्युशन्स प्रोवायडर आहे ज्याची भारत आणि इटलीमध्ये मजबूत उपस्थिती आहे. त्याच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये सेमी हाय-स्पीड ट्रेन, शहरी मेट्रो, पॅसेंजर कोच अर्थात प्रवासी डबे यांचा समावेश आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.