BMC Budget 2024 bmc commissioner iqbal singh chahal know important things about budget  Sakal
Personal Finance

BMC Budget 2024: कोस्टल रोड ते 2,800 बेस्ट बसेस, मुंबईकरांसाठी BMCच्या अर्थसंकल्पात काय आहे खास?

Mumbai BMC Budget 2024 News: मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकाचा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला.

राहुल शेळके

BMC Budget 2024: मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकाचा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मार्च 2022पासून इक्बाल सिंग बीएमसी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.

अर्थसंकल्पानुसार, 'आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय अंदाज 59,954.75 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे, जो 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 10.5 टक्के अधिक आहे, म्हणजेच 54,256.07 कोटी रुपये. 1985 नंतर ही दुसरी वेळ आहे की बीएमसी प्रशासनाने अर्थसंकल्प सादर केला आहे कारण नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.

अर्थसंकल्पाशी संबंधित काही खास गोष्टी

  • अर्थसंकल्पात झिरो प्रिस्क्रिप्शन धोरणांतर्गत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्याद्वारे मुंबईकरांना मोफत आणि परवडणारी औषधे दिली जाणार आहेत.

  • 2024-25 या आर्थिक वर्षात अपेक्षित महसूल उत्पन्न 35749.03 कोटी रुपये आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2,459 कोटी रुपये अधिक आहे.

  • 2024-25 या आर्थिक वर्षात अपेक्षित महसूल खर्च 28121.94 कोटी रुपये असेल.

  • मुंबईच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात 45759.21 कोटी रुपयांची तरतूद असून, कोस्टल रोडसाठी 2900 कोटी रुपयांची तरतूद आहे.

  • यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्टला 928.65 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.

  • स्टार्टअप प्रोक्योरमेंट पॉलिसी स्वीकारणारी BMC ही देशातील पहिली स्थानिक संस्था आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

  • गेल्या वर्षी बीएमसीने 52,619.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. बीएमसीचा अर्थसंकल्प भारतातील 8 राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. या राज्यांमध्ये सिक्कीम, मिझोराम, मेघालय, गोवा, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.

  • गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 5.1870 कोटी. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ट्रॅफिक साइनेज, स्क्रॅपयार्ड, पार्किंग ॲप आणि पार्किंग इन्फ्रा, एरिया ट्रॅफिक कंट्रोल यासाठी एकूण 3200 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

  • घनकचरा व्यवस्थापनासाठी यंदा 168 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महानगर गॅस लिमिटेडसोबत BMC ने MOU वर सही केली आहे.

  • देपनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये बायो सीएनजी प्लांट उभारण्यात येणार असून कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 230 कोटी रुपये अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहेत.

  • पर्यावरण आणि वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अर्थसंकल्पात 178 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

  • वीरमाता जिजाबाई प्राणिसंग्रहालयात या वर्षी मगरी आणि गोरिला आणण्यात येणार आहेत. मुंबई अग्निशमन दलासाठी यावर्षी फायर ड्रोन खरेदी केले जातील, रोबोटिक लाईफसेव्हिंग बॉयज खरेदी केले जातील. यासाठी 235 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • महिला सुरक्षा अभियानांतर्गत अर्थसंकल्पात 100 कोटी रुपये सादर. मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्पासाठी यावर्षी 5045 कोटी रुपये सादर केले. गेल्या वर्षी ते 2560 कोटी रुपये होते.

विशेष प्रकल्पांसाठी तरतूद

  • कोस्टल रोड प्रकल्प रु. 2900.00 कोटी.

  • दहिसर - भाईंदर लिंक रोड (कोस्टल रोड शेवटचा टप्पा) रु. 220.00 कोटी.

  • मुंबई कोस्टल रोड (उत्तर) वर्सोवा ते दहिसर 6 पॅकेज आहे रु. 1130.00 कोटी.

  • गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR) रु. 1870.00 कोटी.

  • सीवरेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट (STP) रु. 4090.00 कोटी. ( Provision for special projects)

रस्ते आणि पुलांसाठी तरतूद

  • वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) वर ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट राबविण्याचा प्रस्ताव आहे.

  • मुंबई कोस्टल रोड वर्सोवा इंटरचेंज ते दहिसर इंटरचेंज आणि GMLR बांधण्यासाठी सुमारे रु.35955.07 कोटी खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प 6 पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे जसे की A B C D E & F आणि सुमारे 48 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (Provision for roads and bridges)

  • धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना : BMC कार्यक्षेत्रात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य. त्यासाठी केलेली तरतूद रु.111.83 कोटी आहे.

  • 1600 बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • नागरिकांच्या स्वच्छतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी BMC ने 7 जून 2023 रोजी 'मुख्यमंत्र्यांची स्वच्छ मुंबई' हेल्पलाइन सुरू केली आहे.

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • मुंबई उद्यान विभाग सुमारे 5 लाख बांबू रोपे लावण्यासाठी ठिकाणे शोधत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT