King Charles III Banknotes Sakal
Personal Finance

Demonetization In Britain: आता ब्रिटनमध्येही नोटाबंदीसारखा निर्णय; चलनी नोटांवर नवा राजा करणार राज्य

राहुल शेळके

King Charles III Banknotes: ब्रिटनमध्ये नोटबंदी झाली आहे का? तिथल्या नोटांवर राणी एलिझाबेथच्या फोटो ऐवजी सध्याचा राजा किंग चार्ल्स तिसरा याचा फोटो असलेल्या नोटा छापल्या आहे. लोक जुन्या नोटा बदलून घेऊ शकतात. बँक ऑफ इंग्लंडने लोकांना राणी एलिझाबेथची प्रतिमा असलेल्या जुन्या नोटा परत करण्यास सांगितले आहे, कारण किंग चार्ल्स III ची प्रतिमा असलेल्या नवीन नोटा आता यूकेमध्ये चलनात येणार आहेत.

किंग चार्ल्स तिसरा आता बँक ऑफ इंग्लंडच्या नोटांवर दिसणारा दुसरा ब्रिटीश राजा बनला आहे. नवीन नोटेवर फक्त किंग चार्ल्स III चा फोटो आहे परंतु नवीन नोटांवरील इतर तपशील तेच आहेत. सप्टेंबरमध्ये 2022मध्ये राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाल्यानंतर नोटांवर किंग चार्ल्सचे फोटो डिसेंबर 2022 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाले होते.

बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे की नवीन नोटा फक्त जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि बँक नोटांच्या मागणीतील एकूण वाढ पूर्ण करण्यासाठी छापल्या जातील. बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर अँड्र्यू बेली म्हणाले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण आम्ही आमच्या नोटांमध्ये प्रथमच बदल केला आहे.

जुन्या नोटांचे काय होणार?

लोक जुन्या नोटा बदलून घेऊ शकतात, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. डेली एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, नोटा बदलून घेण्यासाठी, लोकांना त्यांच्या जुन्या नोटा 5 जून ते 30 जून या कालावधीत बदलाव्या लागतील.

बँक नोटा कशा बदलायच्या?

ज्यांना बँक नोटा बदलून घ्यायच्या आहेत ते 5 जून ते 11 जून आणि 30 जूनपर्यंत थ्रेडनीडल स्ट्रीटवरील बँक ऑफ इंग्लंड काउंटरला भेट देऊन नोटा बदलू शकतात. अर्ज भरूनही नोटा बदलल्या जाऊ शकतात.

जुन्या नोटा अजूनही चलनात राहतील का?

जुन्या नोटा चलनात राहतील. राणी एलिझाबेथ II ची प्रतिमा असलेल्या जुन्या नोटा वैध राहतील आणि नवीन नोटांसोबत चलनात राहतील. बँक ऑफ इंग्लंडने सांगितले की, जुन्या आणि जीर्ण झालेल्या नोटांच्या जागी नवीन नोटा छापण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT