BSNL-TATA Deal Sakal
Personal Finance

BSNL-TATA Deal: टाटा आणि BSNLमध्ये मोठा करार; स्वस्तात मिळणार इंटरनेट, जिओ एअरटेल चिंतेत

BSNL-TATA Deal: अलीकडे जिओ आणि एअरटेलने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. Jio आणि Airtelचे रिचार्ज महाग झाल्यामुळे BSNL ने TATA सोबत हातमिळवणी केली आहे.

राहुल शेळके

BSNL-TATA Deal: अलीकडे जिओ आणि एअरटेलने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. Jio आणि Airtelचे रिचार्ज महाग झाल्यामुळे BSNL ने TATA सोबत हातमिळवणी केली आहे.

TATA आता BSNL ची कमान हाती घेण्याची तयारी करत आहे. असे मानले जात आहे की TCS आणि BSNL यांच्यात 15,000 कोटी रुपयांचा करार झाला आहे, ज्यामुळे भारतातील 4G नेटवर्क आणखी वेगाने विकसीत होईल. याशिवाय 5G नेटवर्कची पायाभरणी करण्याचे कामही केले जाणार आहे.

एवढेच नाही तर TCS आणि BSNL मिळून भारतातील सुमारे 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पुरवणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतातील युजरला आता वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. सध्या 4G इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत, TATA स्पर्धेत आल्यानंतर, BSNL भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करेल आणि Jio, Airtel ला देखील टक्कर देईल.

TCS च्या वतीने, भारतात डेटा सेंटर तयार केले जात आहे. टाटा चार क्षेत्रांमध्ये डेटा सेंटर उभारण्याचे काम करत आहे. ही डेटा केंद्रे भारतातील 4G पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करणार आहेत. त्याच वेळी, BSNL द्वारे देशभरात 9000 हून अधिक 4G नेटवर्क उभारण्याचे काम केले जात आहे.

सोशल मीडियावर BSNLचा ट्रेंड

सोशल मीडियावर लोक BSNLच्या बाजूने वातावरण तयार करत आहेत. तसेच ते बीएसएनएलमध्ये पोर्ट करण्याबाबत बोलत आहेत. सोशल मीडिया युजर्स BSNL वर ALL Eyes On BSNLच्या पोस्टरसह ट्रेंड करत आहे. तसेच जिओवर बहिष्काराचा ट्रेंडही चालवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT