budget 2024 announcement for women lakhpati didi yojana will give benefits to 3 crore mahila Budget 2024  Sakal
Personal Finance

Budget 2024: निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देशात 3 कोटी 'लखपती दीदी' असणार

राहुल शेळके

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या की, आता देशातील 3 कोटी महिलांना सरकारच्या 'लखपती दीदी योजने'चा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकार अर्थसंकल्पात तरतूदही वाढवणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आतापर्यंत देशातील 1 कोटी महिलांना 'लखपती दीदी योजने'चा लाभ मिळाला आहे. सुरुवातीला 2 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते आता 3 कोटी करण्यात आले आहे. या योजनेत अशा महिलांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपये आहे.

लखपती दीदी योजनेचे फायदे

लखपती दीदी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शासनाकडून अनेक प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सरकारकडून आर्थिक मदतही केली जाईल

ज्यामुळे त्यांना लखपती बनवण्यात मदत होईल. या योजनेंतर्गत महिला बचत गटांना एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग, ड्रोन दुरुस्ती आदी तांत्रिक कामे शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले जाणार आहे.

लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये शिकवली जाणार आहेत. त्यांची आर्थिक समज वाढवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असून, त्यांना बचतीचे पर्याय, छोटी कर्जे, व्यावसायिक प्रशिक्षण, उद्योजकता समर्थन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी, महिलांनी स्वयं-सहायता गटाचा भाग असणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT