Union Budget 2024 Science and Technology esakal
Personal Finance

Union Budget 2024 : आता मोबाईल होणार स्वस्त! अन् चार्जरच्या किंमती इतक्या टक्क्यांनी कमी,बजेटमध्ये झाली मोठी घोषणा

Science and Technology Union Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत यामध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यांनी मोबाईल फोन आणि चार्जरवर मूलभूत सीमाशुल्कात मोठी कपात केली.

Saisimran Ghashi

Budget 2024-25 Science and Technology Update : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करीत आहेत या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. मोबाइल फोन आणि चार्जरवरील मूलभूत सीमाशुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे आता मोबाइल उपकरणे आणि घटकांवर लागणारे शुल्क केवळ १५% राहील.मोबाईलचे सुटे भागही आता स्वस्त होणार आहेत.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, "गेल्या सहा वर्षांत देशांतर्गत उत्पादनात तिप्पट वाढ झाली असून, मोबाइल फोन निर्यातीत शंभर पट वाढ झाली आहे. या विकासामुळे भारतीय मोबाइल उद्योगाने ग्राहकांच्या हितासाठी परिपक्वता मिळवली आहे. त्यामुळे आता मोबाइल फोन, मोबाइल पीसीबीए आणि मोबाइल चार्जरवरील सीमाशुल्क १५% करण्याचा प्रस्ताव आहे."

अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी भारतीय मोबाइल उद्योगाच्या वाढीचा आणि ग्राहकांच्या फायद्याचा विशेष उल्लेख केला. या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादनास चालना मिळेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT