Budget 2024 Employment: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारही कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित करू शकते.
देशांतर्गत रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्सने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की रोजगार हमी कार्यक्रम, पीएम आवास योजना, पीएम ग्राम सडक योजना, पीएम किसान सन्मान निधी आणि छोट्या व्यवसायांशी संबंधित योजनांसाठी सरकार अधिक पैसे खर्च करू शकते.
अंतरिम अर्थसंकल्पात कल्याणकारी योजनांसाठी सरकारने जाहीर केलेल्या तरतुदीपेक्षा यावेळी 75,000 कोटी रुपये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगारावर भर देऊ शकते. अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेला बजेटमध्ये प्रोत्साहन दिले जाईल. पीएलआय योजनेंतर्गत वाटपाची रक्कम वाढविण्यावर विचार केला जाईल.
याशिवाय कापड, चामडे, शूज आणि खेळणी यासारख्या अधिक श्रमिक क्षेत्रांचा पीएलआयमध्ये समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय मनरेगा व गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून लोकांना ठराविक अंतराने कामे उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
mPocket चे संस्थापक आणि CEO गौरव जालान यांचे मत आहे की, आगामी पूर्ण अर्थसंकल्पात सरकार रोजगार, पायाभूत सुविधा आणि नाविन्य यावर भर देणार आहे. रोजगारक्षमता सुधारण्यासाठी युवकांच्या कौशल्य विकासाशी संबंधित उपक्रमांवर सरकार दुप्पट भर देईल, अशी त्यांना आशा आहे.
यासोबतच नोकऱ्यांमध्ये वाढ हा सरकारचा मुख्य अजेंडा असेल. लघु आणि मध्यम व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि विकासाचा वेग वाढवण्यासाठी खाजगी क्षेत्राकडून संशोधन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाऊ शकते.
गौरव जालान म्हणाले की, लहान आणि मध्यम व्यवसायांच्या विकासासाठी, कर्जाची उपलब्धता म्हणजेच कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे, यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.