Sovereign Gold Bond Sakal
Personal Finance

Sovereign Gold Bond: अर्थमंत्र्यांचा एक निर्णय अन् मोदींच्या सुवर्ण योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांचे मोठे नुकसान

राहुल शेळके

Budget 2024 Customs Duty On Gold, Silver: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. दागिने आणि सराफा व्यावसायिकांची एक जुनी मागणी या अर्थसंकल्पात पूर्ण झाली. सोने-चांदी इत्यादींवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची मागणी सराफा व्यापारी करत होते. अर्थमंत्र्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली.

या निर्णयाचा जनतेवर दुहेरी परिणाम होत आहे. एकीकडे असे लोक आहेत जे सोने खरेदीच्या तयारीत होते, त्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांचे नुकसान झाले आहे.

कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के करण्याची घोषणा केली. सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्के होती. म्हणजेच अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे चांदीवरील कस्टम ड्युटीही 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आली आहे. सोने-चांदीशिवाय प्लॅटिनमवरही कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त झाले

अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा भाव 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर होता, तो आता 68 हजार रुपयांवर आला आहे. म्हणजेच अर्थसंकल्पापासून सोने प्रति 10 ग्रॅम 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की, बजेटमध्ये कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने सोन्याच्या किमतीवर 6 हजार रुपयांपर्यंत परिणाम होऊ शकतो.

सार्वभौम सुवर्ण रोख्यांवर अर्थसंकल्पाचा परिणाम

अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर सार्वभौम सुवर्ण रोख्यांवर परिणाम झाला असून ते कमी किमतीत व्यवहार करत आहेत. NSE वर सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या किमतींमध्ये 5% पर्यंत घसरण दिसून येत आहे.

SGB ​​ऑगस्ट 2024 (SGB AUG24) बजेटनंतर 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे आणि 7,275 रुपये प्रति युनिटच्या जवळ व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, SGB डिसेंबर (SGB DEC25) सुमारे 6 टक्के घसरणीसह 7,500 रुपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता

सध्याची बाजाराची स्थिती पाहता सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे हे नुकसान तात्पुरते असल्याचे दिसते. सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर केली असली तरी जीएसटी कौन्सिल जीएसटीचे दर 3 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत, सामान्य ग्राहकांसाठी किमती पुन्हा जुन्या पातळीच्या जवळ पोहोचू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT