Budget 2024 There is no change in the tax slab; Finance Minister made a big announcement  Sakal
Personal Finance

Budget 2024 : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत.

राहुल शेळके

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत.

त्या म्हणाल्या की, 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक कार्यक्रम व योजना जनतेच्या हितासाठी केल्या.

सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी सर्वांसाठी विकासाची चर्चा आहे.

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल. कॉर्पोरेट कर 22 टक्के करण्यात आला आहे.

2047 पर्यंत भारत विकसित होईल

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताच्या अर्थव्यवस्थेने गेल्या 10 वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक आव्हानांवर मात केली आहे, अनेक संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत आणि देशाला एक नवी स्थिती आणि दिशा मिळाली आहे.

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या तत्त्वज्ञानावर काम करत सरकारने प्रत्येक वर्गाच्या आणि प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या समृद्धीसाठी काम केले आहे. त्या म्हणाल्या की, आता आम्ही 2047 पर्यंत देश विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहोत. आता भारत उज्ज्वल भविष्याकडे पाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT