Budget 2024 three crore houses free electricity finance minister nirmala sitharaman pm modi  Sakal
Personal Finance

Budget 2024 Electricity: येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे, 300 युनिट मोफत वीज...; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा Video

2 crore houses, 300 units of free electricity in next 5 years: अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत तीन कोटी घरे बांधण्यात आली असून पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जातील.

राहुल शेळके

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत तीन कोटी घरे बांधण्यात आली असून पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जातील.

याशिवाय त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांमध्ये सोलर पॅनलचे वाटप केले जाईल आणि 300 युनिट मोफत वीज दिली जाईल.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आमचे सरकार सर्व लक्ष्य पूर्ण करत आहे. त्या म्हणाल्या की, एक कोटी लखपती दिदी तयार झाल्या असून आता त्या वाढवून 3 कोटी झाल्या आहेत. 9 कोटी महिला 83 लाख बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षे आर्थिक वाढीची वर्षे असतील.

मोफत रेशन योजना 5 वर्षांसाठी वाढवली

मोफत रेशन मिळत असल्याने देशातील 80 कोटी लोकांची चिंता संपली आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, त्यांचे सरकार गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना पाच वर्षांसाठी वाढवेल.

संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या की, स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षित करून कुशल बनवण्यात आले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सक्षमीकरणासाठी सरकार खूप काम करत असून महिला शक्तीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी स्वावलंबी बनवले जात असून मुद्रा कर्ज योजनेंतर्गत 30 कोटी महिलांना कर्ज देण्यात आले आहे. सन 2047 पर्यंत भारत विकसित भारत होईल, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT