पुणे : पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांना आव्हानांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आफ्रिका एक अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असून, भारतीय उद्योजकांनी येथील व्यावसायिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे संचालक दीपक मुखी यांनी येथे केले.
‘फिक्की’ व इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कंपनी असलेल्या अराईज इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल प्लॅटफॉर्म (आयआयपी) यांच्या सहयोगाने नुकत्याच झालेल्या ‘पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
मुखी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारकडून भारतीय उद्योजकांना आफ्रिकेत व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. निर्यात क्षमतेबरोबरच देशांतर्गत होत असलेला खप यामुळे आफ्रिका काही महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करत आहे. भारत व आफ्रिका यांच्यातील व्यापार भागीदारी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे’’
‘अराईज आयआयपी’चे सरव्यवस्थापक रीताब्रता भट्टाचार्य, विपणन विभागाचे प्रमुख नागेश राणे, ग्रीनबॅक ॲडव्हायझरी सर्व्हिसेसचे संचालक मनीस थानावाला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नागेश राणे म्हणाले, ‘‘निर्यातदारांना आफ्रिकेकडे आकर्षित करून तेथे व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘एसईझेड’चे फायदे, पाश्चिमात्य देशांपर्यंत मालवाहतूकीसाठी लागणारा कमी वेळ, स्थिर राजकीय वातावरण यामुळे येथे चांगली संधी आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.