Byju's Lender: भारतीय स्टार्टअप कंपनी बायजूला कर्ज देणाऱ्यांनी बायजू अल्फा कंपनीच्या नियंत्रणासह यूएसमध्ये सुरू असलेला खटला जिंकला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या कर्जदारांमध्ये Redwood Investments LLC आणि Silver Point Capital LP यांचा समावेश आहे.
डेलावेअर चॅन्सरी कोर्टाचे न्यायाधीश मॉर्गन जर्न यांनी निर्णय दिला की बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या नातेवाईकाच्या जागी बायजूच्या अल्फा बोर्डावरील कर्जदारांच्या नॉमिनीला घेण्याचे कर्जदारांना अधिकार आहेत.
Byju's Alpha ही एक विशेष उद्देश कंपनी आहे, जी वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने तयार केली गेली आहे. ब्लूमबर्गच्या मते, न्यायाधीश मॉर्गन जर्न यांनी बायजूची तक्रार नाकारली. कंपनीमध्ये टिमोथी पोहल हे बायजूच्या अल्फाचे एकमेव संचालक होते, असे न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे.
बायजूच्या अल्फाचे एकमेव संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर टिमोथी पोहल यांनी कंपनीतील सर्व अधिकाऱ्यांना हटवून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
काय आहे प्रकरण?
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी बायजूच्या वाढत्या संकटा दरम्यान, कर्जदारांनी कंपनीला कर्ज म्हणून दिलेले 1.2 अब्ज डॉलर परत मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कर्जदारांनी मार्चमध्ये डिफॉल्टची नोटीस दाखल केली. या खटल्यात बायजू यांचा युक्तिवाद असा होता की, कर्जदारांनी वारंवार कर्ज न देण्याचे केलेले युक्तिवाद निराधार आहेत.
कोर्टाने 2 नोव्हेंबरच्या निकालात म्हटले की कर्जाच्या अटींनुसार डिफॉल्ट असल्यास तारण ठेवलेल्या बायजूच्या अल्फा शेअर्सवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कर्जदारांना आहे.
बायजू यांच्या विरुद्ध कर्जाबाबतचा दावा ग्लास ट्रस्ट कंपनीने दाखल केला होता, जी कर्जदारांसाठी विश्वस्त म्हणून काम करते. कर्जदारांसोबतच्या भांडणामुळे काही गुंतवणूकदारांनी बायजूमधील त्यांचा हिस्सा कमी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.