Layoffs Sakal
Personal Finance

Startup Layoffs: मोठं संकट! ही प्रसिद्ध एडटेक कंपनी करणार कर्मचारी कपात, यावेळी वरिष्ठांसह 1,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

मंदावलेली वाढ आणि कठीण आर्थिक स्थिती यामुळे कंपनी आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

राहुल शेळके

Byju's Layoff: देशातील सर्वात मोठी एडटेक कंपनी Byju's कर्मचारी कपातीच्या तयारीत आहे. यावेळी, कंपनीच्या कर्मचारी कपातीमुळे 500 ते 1,000 पूर्णवेळ कर्मचारी प्रभावित होण्याची अपेक्षा आहे.

मंदावलेली वाढ आणि कठीण आर्थिक स्थिती यामुळे कंपनी आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीच्या सर्व विभागात कपात होण्याची अपेक्षा आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, या नवीन कर्मचारी कपातीचा परिणाम उत्पादन आणि तंत्रज्ञान विभागाव्यतिरिक्त मार्केटिंग, विक्री, व्यवसाय विकासावर दिसून येईल. कर्मचारी कपातीचा कंपनीची उपकंपनी व्हाईटहॅट ज्युनियरवर देखील परिणाम होणार आहे.

एडटेक स्टार्टअप कंपनी Byju's 1.2 अब्ज डॉलरच्या कर्जाच्या वादात सापडली आहे. अलीकडे अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही, बायजूने सांगितले होते की ते खर्च कमी करण्यासाठी 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते.

फेब्रुवारीमध्येही एक कोटी रुपयांपर्यंत पगार मिळवणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याची बातमी आली होती. खर्च कमी करण्यासाठी आणि कामकाज सुरळीत करण्यासाठी बायजू गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचारी कपाती करत आहे.

बायजू हे ऑनलाइन शिकवण्याचे अॅप आहे. ज्याद्वारे मुले घरात राहून अभ्यास करू शकतात. बायजू हे अधिकृतपणे थिंक अँड लर्न नावाचे ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप आहे.

या स्टार्टअपची स्थापना बायजू रवींद्रन यांनी केली होती. भारतातील 80 दशलक्षाहून अधिक लोक Byju चे अॅप वापरत आहेत.

एप्रिल 2022 पासून आतापर्यंत जगभरातील कंपन्यांमधील कर्मचारी कपात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बायजूने आता पुन्हा 500 ते 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अडचणीत आलेले स्टार्टअप Byjus कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये खर्चात कपात करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोजगार गमवावा लागत आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, यावेळी वरिष्ठ कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. कंपनीच्या एचआर विभागाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे त्यांचे अधिकृत ई-मेल ब्लॉक करण्यात आले असून त्यांना कंपनीच्या कार्यालयात त्यांची ओळखपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बायजूने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा आणि नाराजी पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT