SBI Sakal
Personal Finance

SBI Bank: ग्राहकांच्या संमतीशिवाय खात्यातून पैसे काढल्याचा SBI वर आरोप, बँकेने दिले स्पष्टीकरण

SBI Bank: ग्राहकाने दावा केला आहे की बचत खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) पैसे डेबिट करण्यात आले.

राहुल शेळके

SBI Bank: बँक ग्राहकांनी त्यांच्या संमतीशिवाय विम्यासाठी त्यांच्या बचत खात्यातून पैसे कापल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असेच एक प्रकरण नीरज पुनिया नावाच्या SBI ग्राहकाने सांगितले आहे. पुनिया यांनी दावा केला की त्यांच्या बचत खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) पैसे डेबिट करण्यात आले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर, त्याने पोस्ट केले, “मी परवानगी दिली नाही किंवा कोणत्याही फॉर्मवर स्वाक्षरी केलेली नाही, तरीही माझ्या खात्यातून PMJJBY साठी पैसे डेबिट झाले आहेत. तुम्ही ग्राहकाच्या परवानगीशिवाय कोणतेही खाते कसे डेबिट करू शकता?"

ट्विटला उत्तर देताना स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की कोणत्याही प्रकारचा विमा किंवा गुंतवणूक निवडणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. पुनिया यांच्या ट्विटला उत्तर देताना, SBI ने म्हटले, “कृपया लक्षात घ्या की विमा आणि इतर गुंतवणुकीची निवड पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि आमच्या ग्राहकांच्या जागरूकतेसाठी आम्ही माहिती देतो.

ग्राहकांना सेवा देताना आम्ही उच्च दर्जाची नैतिकता राखतो आणि ग्राहकाच्या खात्यात त्याच्या/तिच्या संमतीशिवाय कोणतेही व्यवहार केले जात नाहीत.”

तक्रार कशी करायची?

SBI चे ग्राहक https://crcf.sbi.co.in/ccf वर विमा पॉलिसींच्या चुकीच्या विक्रीविरोधात तक्रार करू शकतात.

काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना?

देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना.

या विमा योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील प्रत्येक घटकाला अत्यंत कमी रकमेत विमा उपलब्ध करून देते. कोणताही नागरिक केवळ 436 रुपये वार्षिक भरून 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकतो. सरकारने 2015 मध्ये जीवन ज्योती विमा योजना सुरू केली.

जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 436 रुपये द्यावे लागतील. 2022 पूर्वी पॉलिसी खरेदी करण्यासाठी फक्त 330 रुपये द्यावे लागायचे. सरकारने नंतर ती वाढवून 436 रुपये केली. या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन किंवा तुमच्या बँकेच्या नेट बँकिंगद्वारे घरी बसून ही पॉलिसी घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT