नवी दिल्ली- केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी सोमवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, डिप सी प्रोजेक्ट अंतर्गत पहिल्यांदा तेल बाहेर काढण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनाऱ्यापासून ३० किलोमीटर अंतरवर ७ जानेवारी रोजी हे इंधन तेल काढण्यात आले आहे. (Centre announces fresh oil discovery in Krishna Godavari Petroleum and Natural Gas Basin Hardeep Singh Puri)
पुरी म्हणाले की, कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात काकीनाडा किनाऱ्यापासून ३० किलोमीटर अंतरवार पहिल्यांदा तेल बाहेर काढण्यात आलं आहे. हा प्रोजेक्ट २०१७-१८ मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे कामात अनेकदा अडथळा आला. पण, सध्या तेथील २६ विहिरींपैकी ४ विहिरी पूर्ण क्षमतेने सक्रीय आहेत.
आपल्याला काही काळातच वायू देखील मिळायला सुरुवात होईल, पण मे आणि जून महिन्यापर्यंत आम्हाला आशा आहे हे दरदिवशी आम्ही ४५,००० बॅरल तेल बाहेर काढू शकू. एकूण कच्च्या तेलाच्या निर्मितीपैकी ते ७ टक्के असेल. इंधन वायू निर्मितीच्या देखील ते ७ टक्के असेल. याच संदर्भात ऑईल अँड नॅचरल गॅस कॉरपरेशनने सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
भारत हा प्रामुख्याने इंधन तेलासाठी इतर देशांवर अवलंबून असणारा देश आहे. भारताच्या एकूण तेल गरजेपैकी जवळपास ८५ टक्के तेल आपण आयात करतो. त्यामुळे इंधन तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे नव्याने सापडलेला साठा महत्त्वाचा आहे. ओएनजीसीने दिलेल्या माहितीनुसार, फेज-२ मध्ये हा साठा सापडला आहे. फेज-३ चे काम सुरु असून जून २०२४ पर्यत ते पूर्ण होईल.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.