CEO salaries grew 40 percent on average in the past four years, Deloitte survey finds Sakal
Personal Finance

CEO Salary: सीईओंच्या पगारात झाली भरघोस वाढ; भारतात कंपन्यांच्या सीईओचा पगार किती?

CEO Salary: कोणत्याही कंपनीच्या सीईओवर कंपनीची मोठी जबाबदारी असते. अशा परिस्थितीत सीईओचा पगार किती आहे हे जाणून घेण्यातही अनेकांना उत्सुकता असते. Deloitte ने भारतीय CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वेतनाबाबत एक अहवाल सादर केला आहे.

राहुल शेळके

CEO Salary: कोणत्याही कंपनीच्या सीईओवर कंपनीची मोठी जबाबदारी असते. अशा परिस्थितीत सीईओचा पगार किती आहे हे जाणून घेण्यातही अनेकांना उत्सुकता असते. Deloitte ने भारतीय CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वेतनाबाबत एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, भारतात सीईओचा सरासरी पगार 13.8 कोटी रुपये आहे. हा पगार कोविड-19 पूर्वीच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या 4 वर्षांत भारतातील सीईओंच्या सरासरी वार्षिक पगारात 40% वाढ झाली आहे. 2020 मध्ये पगार 9.8 कोटी रुपये होता. तो आता 13.8 कोटी रुपये झाला आहे. 20 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या सीईओंची संख्याही दुपटीने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

75% सीईओ आता वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावतात

Deloitte India Executive Performance and Rewards Survey 2024 नुसार, भारतातील 75% CEO आता वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावतात. 2020 मध्ये ही संख्या 66% होती.

हे सर्वेक्षण 400 कंपन्यांवर आधारित आहे (सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या वगळता). 5 कोटी ते 10 कोटी रुपये कमावणाऱ्या सीईओंची संख्या कमी झाली आहे, 10 कोटी ते 20 कोटी रुपये कमावणाऱ्या सीईओंची संख्या वाढली आहे.

वार्षिक 5 कोटी ते 10 कोटी रुपये कमावणाऱ्या सीईओंची टक्केवारी 35 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर घसरली आहे. परंतु, 10 कोटी ते 20 कोटी रुपये कमावणाऱ्यांची टक्केवारी 22 टक्क्यांवरून 27 टक्क्यांवर गेली आहे. 20 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या सीईओंची टक्केवारी 10 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर गेली आहे.

गेल्या चार वर्षांत प्रोफेशनल सीईओच्या तुलनेत प्रवर्तक सीईओचे वेतन वाढले

गेल्या चार वर्षांत प्रवर्तक सीईओंचे सरासरी वेतन प्रोफेशनल सीईओंच्या तुलनेत अधिक वाढले आहे. या काळात प्रवर्तक सीईओचा सरासरी पगार 14 टक्क्यांनी वाढून 16.7 कोटी रुपये झाला आहे. पूर्वी तो 10 कोटी रुपये होता. प्रोफेशनल सीईओंचे सरासरी वेतन 9.7 कोटी रुपयांवरून 8 टक्क्यांनी वाढून 13 कोटी रुपये झाले आहे.

अहवालात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांत कंपनीचे प्रवर्तक आणि प्रोफेशनल सीईओ यांच्या वेतनाचे प्रमाण 1.0 वरून 1.3 पर्यंत वाढले आहे. 2020 मध्ये, 12% प्रोफेशनल सीईओ 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत होते.

2024 मध्ये ही संख्या 17% पर्यंत वाढेल. प्रवर्तक सीईओसाठी ही वाढ खूप जास्त आहे. 2020 मध्ये, केवळ 9% प्रवर्तक सीईओ 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत होते. 2024 मध्ये ही संख्या 36% पर्यंत वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT