Chandrababu Naidu Among Richest Politicians in india With Rs 668 Crore  Sakal
Personal Finance

Chandrababu Naidu: 371 कोटींच्या घोटाळ्यात अटक झालेले चंद्राबाबू नायडू आहेत 'एवढ्या' संपत्तीचे मालक

राहुल शेळके

Chandrababu Naidu Net Worth: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सकाळी राज्य सीआयडीने अटक केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या (APSSDC)नावाखाली 371 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप नायडूंवर आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का की तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा समावेश अजूनही देशातील टॉप-5 श्रीमंत आमदारांमध्ये आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे ते मालक आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडे कोणती संपत्ती आहे.

एन. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशातील चित्तूरमधील कुप्पम मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशात चंद्राबाबू नायडूंपेक्षा जास्त संपत्ती असलेले केवळ 3 आमदार आहेत. हे तीन आमदारही दक्षिणेतील राज्यांचे आहेत.

चंद्राबाबू नायडू यांची संपत्ती किती?

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार चंद्राबाबू नायडू यांच्याकडे एकूण 668.57 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्यावरील कर्ज केवळ 15 कोटी रुपये आहे. यापैकी त्यांच्याकडे हेरिटेज फूड्स लिमिटेड कंपनीतील हिस्सेदारीमुळे सुमारे 545 कोटी रुपये आहेत.

त्यांच्याकडे कंपनीचे 1,06,61,652 शेअर्स आहेत. 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या वेळी, त्यांच्या शेअर्सचे मूल्य 511.90 रुपये होते. मात्र, सध्या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य 272 रुपयांपर्यंत खाली आले आहे.

अशाप्रकारे चंद्राबाबू नायडू यांच्या मालमत्तेतील या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य केवळ 289 कोटी रुपये इतके कमी झाले आहे. याशिवाय त्यांच्याकडे विजया बँकेचे 100 शेअर्स आहेत, जे आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाले आहेत. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात सुमारे 45 लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले होते. तर पत्नीच्या खात्यात 16 लाख रुपये जमा करण्यात आले.

सोने आणि मालमत्तेत गुंतवणूक

चंद्राबाबू नायडू यांनी सोने आणि मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे सोने, चांदी, दागिने आणि रत्ने इत्यादी एकूण दोन कोटी रुपये आहेत.

याशिवाय त्यांच्या संपत्तीमध्ये 45 कोटी रुपयांची शेतजमीन, 29 कोटी रुपयांच्या व्यावसायिक इमारती आणि 19 कोटी रुपयांच्या निवासी इमारतींचा समावेश आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे एकूण 94 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

चंद्राबाबूंपेक्षा श्रीमंत आमदार

देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे. यानंतर कर्नाटकचे एच. पुट्टुस्वामी गौडा हे 1,267 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि 1,156 कोटी रुपयांच्या संपत्तीसह कर्नाटकचे प्रियकृष्ण तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशातील पाचवे श्रीमंत आमदार गुजरातचे जयंतीभाई सोमभाई पटेल आहेत. त्यांची एकूण संपत्ती 661 कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूवरुन 'अमूल'चं स्पष्टीकरण; म्हणाले, आमचा पुरवठा...

IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे बँकेत हेलपाटे,साडेअकरा लाख महिला पात्र : तिसऱ्या हप्‍त्याच्या प्रतीक्षेत

HC scraps IT rules: कुणाल कामराचा दणका! हाय कोर्टाने आयटी नियमावलीतील दुरुस्ती केली रद्द, आतापर्यंत काय-काय घडलं?

Latest Marathi News Updates : आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा फीसकटली

SCROLL FOR NEXT