पगारदारवर्गाच्या करविवरणपत्रातील बदल Sakal
Personal Finance

पगारदारवर्गाच्या करविवरणपत्रातील बदल

करदात्यांना नव्या करप्रणालीनुसार कर भरायचा नसेल, तर त्या करप्रणालीची ‘निवड’ रद्द करावी लागेल आणि जुन्या करप्रणालीचा स्वीकार करून, त्यानुसार कर भरावा लागेल.

डॉ. दिलीप सातभाई dvsatbhaiandco@gmail.com

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची वेळ आता समीप येत चालली आहे, त्यामुळे करदात्यांना दरवर्षीप्रमाणे विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरायचा? त्यात काही बदल झाले आहेत का? कोणती नवी माहिती द्यावी लागणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. यंदा ‘फॉर्म-१’मध्ये दोन ठळक बदल करण्यात आले आहेत, तर ‘फॉर्म-२’मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

‘फॉर्म-१’मधील बदल

नवी करप्रणाली निवड रद्द करणे

करदात्यांना नव्या करप्रणालीनुसार कर भरायचा नसेल, तर त्या करप्रणालीची ‘निवड’ रद्द करावी लागेल आणि जुन्या करप्रणालीचा स्वीकार करून, त्यानुसार कर भरावा लागेल. पात्र करदात्यांना नव्या करप्रणालीतून बाहेर पडता येते. तथापि, या पर्यायाचा उपयोग करण्यासाठी, इतर उत्पन्न असलेल्या करदात्याने करप्रणालीची निवड विवरणपत्रात सूचित करणे आवश्यक आहे.

अग्निवीर कॉर्पस फंड

अग्निपथ योजनेत नोंदणी केलेल्या आणि एक नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यानंतर अग्निवीर कॉर्पस फंडाचे सदस्यत्व घेतलेल्या व्यक्तींना यात जमा केलेल्या रकमेसाठी त्यांच्या उत्पन्नातून वजावट घेता येईल. वजावटीसाठी पात्र रक्कम दर्शविण्यासाठी एक स्तंभ समाविष्ट करण्यात आला आहे.

‘फॉर्म-२’मधील बदल

बँक खात्यांची माहिती

प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये करपरतावा मिळण्यासाठी विशिष्ट खात्याच्या निवडीसह करदात्याच्या सर्व बँक खात्यांबद्दल माहिती देणे आवश्यक असते. नव्या विवरणपत्रामध्ये, करदात्याने त्याची निष्क्रिय खाती वगळता, इतर सर्व बँक खात्यांची माहिती देणे बंधनकारक आहे.

अपंग व्यक्तीची देखभाल

एखाद्या रहिवासी व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाने अपंगत्व असलेल्या कुटुंबातील सदस्यासाठी वैद्यकीय खर्च किंवा विमा हप्ता भरला असेल, तर ती पूर्ण रक्कम वजावटीसाठी पात्र ठरते. नव्या ‘शेड्यूल ८०डीडी’मध्ये • अपंगत्वाचे स्वरूप • अवलंबितांचा प्रकार (पती, पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, आई, भाऊ, बहीण आदी.) • अवलंबितांचा पॅन, आधार • ‘फॉर्म १०-आयए’चा पोचपावती क्रमांक • ‘यूडीआयडी’ क्रमांक आदी माहिती द्यावी लागते.

आयुर्विमा पॉलिसी बोनस

उच्च आयुर्विमा हप्ता पॉलिसीच्या बोनसमधून मिळालेली रक्कम ‘इतर स्रोत’ या शीर्षकाखाली करपात्र असणार आहे. यासाठी कलम ५६(२) मध्ये उपकलम समाविष्ट करण्यात आले आहे. याची माहिती ‘शेड्यूल-ओएस’मध्ये समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.

भांडवली नफा जमा खाते योजना

‘भांडवली नफा’संदर्भातील ‘शेड्यूल- सीजी’मध्ये करदात्याने विक्री केलेल्या भांडवली मालमत्तेची माहिती, खरेदीदाराचे तपशील आणि केलेला खर्च व रकमेबद्दलच्या तपशिलांसह विविध उपयुक्त माहिती देणे आवश्यक आहे. ‘शेड्यूल-सीजी’मध्ये आता ‘कॅपिटल गेन अकाउंट स्कीम’मध्ये मालमत्ता विकून जमा झालेल्या रकमेपैकी या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या सद्य माहितीखेरीज ‘सीजीएसएस’मध्ये जमा रकमेची तारीख, ठेव खाते क्रमांक, बँकेचा ‘आयएफएस’ कोड द्यावा लागेल.

ऑनलाइन गेम

एक एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर ऑनलाइन गेममधील जिंकलेली सर्व बक्षिसे ३० टक्के दराने करपात्र असतील आणि ‘टीडीएस’च्या अधीन असतील. ऑनलाइन गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देण्याकरिता ‘शेड्यूल ओएस’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

राजकीय पक्षांच्या देणग्या

राजकीय पक्ष किंवा निवडणूक ट्रस्टला दिलेले योगदान उत्पन्नातून वजावट मिळण्यास पात्र असते. यासाठी नव्या ‘शेड्यूल ८० जीजीसी’मध्ये त्याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. यात • योगदानाची तारीख • रक्कम (रोख किंवा अन्य पद्धतीच्या माहितीसह) • ‘यूपीआय’ हस्तांतरणासाठी व्यवहार संदर्भ क्रमांक किंवा चेक क्रमांक/आयएमपीएस/एनईएफटी/आरटीजीएस • बँकेचा ‘आयएफएससी’ कोड द्यावा लागेल.

लीगल एन्टिटी आयडेंटीफायर

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ‘एनईएफटी’ आणि ‘आरटीजीएस’ पेमेंट सिस्टीमद्वारे एकरकमी ५० कोटी रुपये आणि त्याहून अधिकच्या सर्व पेमेंट व्यवहारांमध्ये (व्यक्ती सोडून) ज्यांनी पैसे पाठविले त्या प्रेषकाचे आणि ज्याला पैसे मिळाले त्या लाभार्थीची माहिती समाविष्ट करावी लागते.

‘ईएसओपी’वर स्थगित कर

पात्र स्टार्ट-अपच्या कर्मचाऱ्यांबाबत अशा सुविधांवरील (परक्विझिट) करकपातीचे दायित्व पुढे ढकलले जाते. अशा व्यवहारांची माहिती ‘शेड्यूल-ईएसओपी’मध्ये ‘स्थगित कर’ गटात देणे आवश्‍यक आहे. यामध्ये मूल्यमापन वर्ष, पुढे आणलेल्या स्थगित कराची रक्कम, चालू मूल्यांकन वर्षात देय कराची रक्कम, पुढील मूल्यांकन वर्षासाठी पुढे ओढण्यात येणाऱ्या कराची शिल्लक रक्कम यासह नियोक्त्याचा पॅन व ‘डीपीआयआयटी’ नोंदणी क्रमांकही द्यावा लागेल.

‘आयएफएससी’चा लाभांश

‘आयएफएससी’मधील युनिटकडून मिळालेल्या लाभांश उत्पन्नावर २० टक्क्यांऐवजी १० टक्के दराने कर आकारला जाणार आहे. यासाठी ‘शेड्यूल ओएस’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT