Coca-Cola offers 1-billion dollar swig to India Inc families  Sakal
Personal Finance

Coca Cola: कोका-कोला पेप्सीच्या पावलावर टाकणार पाऊल; कंपनीला हवेत भारतीय खरेदीदार, काय आहे कारण?

Coca Cola: कोका-कोला आणि पेप्सी या दोन कंपन्या बाजारात एकमेकांच्या स्पर्धक आहेत. या दोन कंपन्या अनेकदा त्यांच्या जाहिरातींमध्ये एकमेकांचा अपमान करत असतात. पण आता कोका-कोला भारतातील पेप्सी कंपनीचे बिझनेस मॉडेल कॉपी करणार आहे.

राहुल शेळके

Coca Cola: कोका-कोला आणि पेप्सी या दोन कंपन्या बाजारात एकमेकांच्या स्पर्धक आहेत. या दोन कंपन्या अनेकदा त्यांच्या जाहिरातींमध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. पण आता कोका-कोला भारतातील पेप्सी कंपनीचे बिझनेस मॉडेल कॉपी करणार आहे. त्यासाठी चार बड्या उद्योगपतींशीही बोलणी सुरू केली आहेत.

कोका-कोला सध्या भारतात स्वतःची उत्पादने स्वतः बॉटलिंग करत आहे. भारतातील काही प्रादेशिक बाजारपेठांमध्ये हे काम आउटसोर्स केले असले तरी, एकूणच हे काम तिच्या उपकंपनी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) द्वारे केले जाते.

कोका-कोलाचा प्लॅन काय आहे?

कोका-कोला तिच्या उपकंपनी HCCB चा IPO लॉन्च करू इच्छित आहे. यामध्ये, ते अगदी लहान भाग विकून सुरुवात करतील, हळूहळू शेअर बाजाराच्या नियमांनुसार, ते किमान 25 टक्के सार्वजनिक शेअर होल्डिंगवर नेले पाहिजे असा नियम आहे.

कंपनी भारतातील 4 मोठ्या व्यावसायिक घराण्यांशी चर्चा करत आहे, जिथे कंपनीला सुमारे 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8300 कोटी रुपये) गुंतवणूक करायची आहे.

कोका-कोला पेप्सीच्या मार्गावर

कोका-कोलाची उपकंपनी एचसीसीबीने 1997 मध्ये काम सुरू केले. सध्या कंपनी 62 प्रकारच्या शीतपेयांच्या बाटल्या पुरवते. त्याचे देशभरात सुमारे 16 कारखाने आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा सुमारे 810 कोटी रुपये आहे.

जानेवारी 2024 मध्ये, कंपनीने बिहार, राजस्थान, ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमधील काही भागात आपला बॉटलिंग व्यवसाय स्थानिक स्वतंत्र बॉटलर्सना विकला आहे. या बाबतीत कोका-कोला भारतातील पेप्सी कंपनीच्या पावलावर पाऊल टाकत आहे.

पेप्सीने भारतातील आपला संपूर्ण बॉटलिंग व्यवसाय वरुण बेव्हरेजेसकडे सोपवला आहे. Coca-Cola ला हे मॉडेल कॉपी करायचे आहे. या बाबतीत पेप्सीचे यश सर्वांनाच माहीत आहे. वरुण बेव्हरेजेसची सूची आणि त्याच्या शेअर्सच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे तिचे मालक रवी जयपुरिया हे आज भारतातील अब्जाधीशांमध्ये आहेत.

'या' 4 व्यावसायिक घराण्यांशी डीलची चर्चा

कोका-कोलाला बॉटलिंग ऑपरेशन्ससाठी दीर्घकालीन भागीदार हवा आहे. त्यामुळेच ती स्ट्रॅटेजिक डील्सवर भर देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ज्युबिलंट फूड वर्क्स, डाबर ग्रुप, पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि एशियन पेंट्स यांच्याशी चर्चा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या कंपन्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ज्युबिलंट फूड वर्क्स ही भारतातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट चेन कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी डॉमिनोज आणि डंकिन्स सारख्या साखळ्या चालवते. कंपनीचे अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये या ब्रँडचे ऑपरेशन्स देखील आहेत. डाबर ग्रुपची एफएमसीजी क्षेत्रात आधीच मजबूत पकड आहे. तर पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि एशियन पेंट्सची त्यांच्या विभागात मक्तेदारी आहे आणि त्यांचे देशभरात मोठे रिटेल नेटवर्क आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT