ICC World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 आज 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या आयसीसी स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
वर्ल्ड कपचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत किमान 13,500 कोटी रुपयांची भर पडेल. असे वृत्त BQ प्राइमने दिले आहे.
(Cricket World Cup 202 boost Indian economy By Rs 13,500 Crore)
डेटानुसार एका प्रेक्षकाला त्याच्याच शहरात सामना पाहण्यासाठी एकूण 7,600 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच यातून एकूण 755 कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाचा एका व्यक्तीचा सरासरी खर्च 32,100 रुपये आहे. 14.9 लाख इंटरसिटी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांच्या संख्येनुसार एकूण 4,781 कोटी रुपये जमा होतील.
एका ट्रॅव्हल एजन्सीच्या डेटानुसार, भारतात येणारे परदेशी पर्यटक सरासरी 30% विमानभाडे आणि 70% पर्यटन आणि इतर खर्च करतात. भारताव्यतिरिक्त, वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर 9 देशांच्या तुलनेत भारताचा सरासरी खर्च 63,000 रुपये आहे.
त्यामुळे उर्वरित 70% खर्च मोजला तर तो 1.47 लाख रुपये येतो. यानुसार सर्व आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पर्यटनावर 5,705 कोटी रुपये खर्च करतील.
पायाभूत सुविधांवर बीसीसीआयचा खर्च
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय या सामन्याचे आयोजन करणाऱ्या 10 स्टेडियमपैकी प्रत्येकी 500 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे पर्यटन आणि पायाभूत क्षेत्राचा कर्च 6,200 कोटी रुपयांचा आहे. अशा प्रकारे, वर्ल्ड कप 2023 मुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 13,500 कोटी रुपयांची भर पडेल असा अंदाज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.