WazirX Crypto: भारतीय क्रिप्टो कंपनी WazirX ने त्यांच्या चोरी झालेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही करोडपती बनू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त WazirXच्या चोरीच्या मालमत्तेचा शोध घ्यावा लागेल. WazirX ही एक भारतीय क्रिप्टो एक्सचेंज कंपनी आहे. अलीकडेच कंपनीला हॅकिंगचा सामना करावा लागला.
18 जुलै रोजी भारतीय क्रिप्टो एक्सचेंज फर्म WazirX सोबत ही घटना घडली, जेव्हा हॅकर्सनी त्यांचे वॉलेट फोडले आणि करोडो रुपयांच्या विविध क्रिप्टोकरन्सी काढून घेतल्या. त्यानंतर कंपनीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरून सर्व प्रकारच्या पैसे काढण्यावर बंदी घातली. त्यांची चोरीला गेलेली मालमत्ता अद्याप सापडलेली नाही.
हॅकर्सनी WazirX कडून 234 दशलक्ष डॉलर किमतीची मालमत्ता चोरली. चोरी झालेल्या मालमत्तेत अनेक क्रिप्टोकरन्सीचा समावेश आहे. हॅकर्सनी WazirX च्या सिस्टममध्ये प्रवेश केला आणि 100 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीची शिबा इनू क्रिप्टोकरन्सी चोरली.
चोरी झालेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये 52 दशलक्ष डॉलर समतुल्य Ethereum, 11 दशलक्ष डॉलर इतके मॅटिक आणि 6 दशलक्ष डॉलर समतुल्य PayPe चा समावेश आहे.
कंपनी आता आपली चोरी झालेली मालमत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी WazirX च्या सह-संस्थापकाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या ऑफरची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की चोरीची मालमत्ता परत मिळविणाऱ्या कोणत्याही कंपनीला किंवा व्यक्तीला बक्षीस म्हणून 192.46 कोटी रुपये दिले जातील.
कंपनीने यापूर्वी वसुलीसाठी बक्षीस म्हणून कमी रक्कम देऊ केली होती. चोरीच्या मालमत्तेची महत्त्वाची माहिती दिल्यास 10 हजार डॉलर्स बक्षीस म्हणून दिले जातील, असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते.
याशिवाय कंपनी वसूल केलेल्या रकमेपैकी 5 टक्के व्हाईट हॅट रिवॉर्ड म्हणून देईल. त्यानंतर कंपनीने बक्षीस वाढवून 11.5 दशलक्ष डॉलर केले. आता ते 23 दशलक्ष डॉलर करण्यात आले आहे. इंटरनेट युजर्स आधी कमी रिवॉर्डसाठी कंपनीवर टीका करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.