Dabur India Sakal
Personal Finance

Dabur India: डाबर कंपनीच्या उत्पादनावरून अमेरिका आणि कॅनडात गोंधळ, 5,400 खटले दाखल, शेअर्समध्ये मोठी घसरण

Dabur India: कंपनीच्या शेअर्समध्ये एक टक्का घसरण झाली.

राहुल शेळके

Dabur India: डाबर इंडिया बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. डाबरच्या 3 उपकंपन्यांविरुद्ध अमेरिका आणि कॅनडामध्ये खटले सुरू आहेत. कंपनीने माहिती दिली की या देशांतील ग्राहकांनी आरोप केला आहे की डाबरच्या उत्पादनांमध्ये अशी रसायने मिसळली जात आहेत ज्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो.

कंपनीचे म्हणणे आहे की, बिनबुडाच्या आणि अपूर्ण अभ्यासाच्या आधारे कंपनीवर आरोप करण्यात आले आहेत. कंपनीने सांगितले की, कंपन्यांविरुद्ध 5,400 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये डाबरच्या तीन सहयोगी कंपन्या नमस्ते लॅबोरेटरीज, डर्मोविवा स्किन एसेंशियल आणि डाबर इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या युनिट्सने काहीही चुकीचे केले नाही आणि न्यायालयात स्वतःचा बचाव करण्यासाठी वकील नियुक्त केले आहेत.

या बातमीमुळे बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये एक टक्का घसरण झाली. आज म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी कंपनीचे शेअर्स 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह 526.55 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.

कंपनीला 321 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस

तेल आणि साबण यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू बनवणाऱ्या डाबरला 320.60 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्याची नोटीस मिळाली आहे. डाबर इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली आहे.

कंपनीने सांगितले की, 'डाबरला केंद्रीय GST (CGST) कायदा, 2017 च्या कलम 74(5) अंतर्गत कर दायित्वाबाबत माहिती मिळाली आहे.

यामध्ये व्याज आणि दंडासह 320.60 कोटी रुपये जीएसटी म्हणून भरण्याची सूचना देण्यात आली आहे. तसे न केल्यास कारणे दाखवा नोटीस जारी केली जाईल. मात्र, जीएसटी नोटीसचा मागणीचा कंपनीच्या आर्थिक किंवा अन्य कामांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे डाबरने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading Opening: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स 634 अंकांनी वाढला, निफ्टीही 24,300च्या वर

Arvind Sawant: 'इम्पोर्टेड माल' प्रकरण अरविंद सावंत यांना भोवलं! शयना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Virat Kohli RCB Captain: विराट कोहली पुन्हा कर्णधारपदी दिसणार का? मुख्य प्रशिक्षक Andy Flower यांनी दिले मोठे संकेत

India Global Mediator: जागतिक मध्यस्थ म्हणून भारताचं स्थान बळकट; BRICS आणि G7 परिषदांमध्ये भारताची भूमिका ठरली महत्वाची

दिवाळीला पत्नी माहेरून आली नाही, नैराश्यातून पतीनं चिमुकल्याला संपवलं, नंतर... घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT