DDA Housing Scheme 2023 Sakal
Personal Finance

DDA Housing Scheme: घर घेण्याचं स्वप्न पाहताय? इथे मिळेल फक्त 10 लाखांत घर

स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

राहुल शेळके

DDA Housing Scheme 2023: राष्ट्रीय राजधानीत घर खरेदी करणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. याचे कारण म्हणजे दिल्लीत घरांच्या किंमती खूप महाग आहेत. मात्र, तुमचेही दिल्लीत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही दिल्लीत स्वस्तात घर खरेदी करू शकता.

या योजनेत 5,500 नवीन घरे

दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) शुक्रवारी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर भव्य गृहनिर्माण योजना सुरू केली. या योजनेत दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी विविध श्रेणीतील 5,500 फ्लॅट उपलब्ध आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार लोकांसाठी परवडणाऱ्या घरांची ही योजना सुरू केल्याचे डीडीएचे म्हणणे आहे.

या ठिकाणी नवीन फ्लॅट बांधले आहेत

संस्थेने 14 जून रोजी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर गृहनिर्माण योजनेचा चौथा टप्पा सुरू करण्यास मान्यता दिली होती. केवळ टोकन रक्कम भरून पसंतीचा फ्लॅट बुक करण्याची सुविधा आहे.

या योजनेअंतर्गत नरेला, सिरसपुर, रोहिणी, लोकनायक पुरम येथे 1-BHK फ्लॅट्स, नरेला आणि द्वारका येथे 2-BHK फ्लॅट्स आणि जसोला येथे 3-BHK फ्लॅट्स उपलब्ध करून दिले जात आहेत.

फ्लॅटच्या किंमती किती आहेत?

डीडीएने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत कोणीही आपले घर 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतो. नरेला येथे 1-BHK फ्लॅटची किंमत 9.89 लाख रुपये आहे.

आणि लोकनायकपुरममध्ये 1-BHK फ्लॅटची किंमत 26.98 लाख ते 28.47 लाख रुपये आहे. 3-BHK फ्लॅटची किंमत 2.08 कोटी ते 2.18 कोटी रुपये आहे. नरेलामध्ये 2-BHK फ्लॅटची किंमत 1 कोटी रुपये आहे, तर द्वारकामध्ये 1.23 कोटी ते 1.33 कोटी रुपये आहे.

बुकिंग करा फक्त 50 हजारात

DDA अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत फ्लॅटची नोंदणी 30 जूनच्या संध्याकाळपासून सुरू झाली आहे. आणि त्यासाठी बुकिंग 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.

डीडीएच्या'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' सेवा योजनेमध्ये केवळ 50,000 रुपये भरून फ्लॅट बुक केला जाऊ शकतो. ही घरे ग्राहकांसाठी आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी कनेक्टिव्हिटी आणि इतर सुविधांचा विस्तार करण्यात आल्याचे डीडीएचे म्हणणे आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

पायरी 1: दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (DDA) अधिकृत वेबसाइटला भेट द्या म्हणजेच dda.gov.in

पायरी 2: आवश्यक तपशील भरुन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन अर्ज पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT