Dearness allowance hiked Sakal
Personal Finance

DA Hike: केंद्र सरकारने दिली दिवाळी भेट! महागाई भत्ता वाढवून सरकारी कर्मचाऱ्यांना केले खूश; किती वाढणार पगार?

राहुल शेळके

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. देशातील सुमारे एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुमारे 49 लाख कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजे डीए आणि डीआरमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे.

सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाची व्यवस्था सरकारने केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला असून या निर्णयाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

यावेळी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात मोठी वाढ मिळणार आहे. कारण 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता लागू केला जाईल. यामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हीसाठी पात्र असलेल्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वाढीव थकबाकी मिळेल.

ही वेळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीसाठी चांगली आहे. कारण आतापासून फक्त 15 दिवसांनी दिवाळीचा सण साजरा होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयात कोस्टल शिपिंग विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे. कोस्टल शिपिंग बिल 2024 या विधेयकाद्वारे किनारपट्टी भागांना कसा फायदा होईल याचीही घोषणा कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये केली जाईल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. 6 रब्बी पिकांचा MSP 2% वरून 7% करण्यात आला आहे आणि कमाल वाढ गव्हाच्या किमान आधारभूत किमतीवर करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Assembly Elections: महायुतीत जागावाटपाचा पेच वाढणार? देवेंद्र फडणविसांना पत्र, रामदास आठवलेंकडून 'इतक्या' जागांची मागणी

Nikki Tamboli : "ते सगळं फेक.." निक्की बनली अरबाजचं नातं तुटण्याचं कारण ? निक्कीकडूनच खुलासा

Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'ती' कृती अन् विधान;अजित पवारांना मान खाली घालून हसू आवरेना

"अभिनेत्रींनी चेहऱ्यावर बोटॉक्सचा भडीमार करणं चुकीचं" ; मर्डर फेम मल्लिका शेरावतने व्यक्त केली चिंता , कास्टिंग काऊचबद्दल म्हणाली

SCROLL FOR NEXT