demand for office spaces for first quarter of this year in eight metros country Sakal
Personal Finance

देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांच्या मागणीत वाढ

कार्यालयीन जागांच्या व्यवहारात सह-कार्यालयीन जागा अर्थात को-वर्किंग अथवा फ्लेक्स स्पेसचे प्रमाण २३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. कार्यालयीन जागांच्या व्यवहारात सह-कार्यालयीन जागा अर्थात को-वर्किंग अथवा फ्लेक्स स्पेसचे प्रमाण २३ टक्क्यांवर पोहोचले आहे.‘नाइट फ्रँक इंडिया’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या देशातील मालमत्ता क्षेत्राच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

यंदा फ्लेक्स स्पेसमध्ये पुणे आघाडीवर असून शहरात १२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. त्या खालोखाल बंगळूरमध्ये नऊ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. देशातील आठ महानगरांतील कार्यालयीन जागांच्या व्यवहारांचा जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आढाव्यानुसार, पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांचे १ कोटी ६२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत त्यात ४३ टक्के वाढ झाली आहे.

कार्यालयीन जागांमध्ये सर्वाधिक व्यवहार बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील कार्यालये, जागतिक सुविधा केंद्रे यांचा वाटा सर्वाधिक आहे. हा वाटा अनुक्रमे ५९ लाख चौरस फूट आणि ५० लाख चौरस फूट आहे. त्यानंतर सह-कार्यालयीन जागा (को-वर्किंग स्पेस) वाटा ३८ लाख चौरस फूट आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत हा वाटा ३४ लाख चौरस फूट होता.

अनेक छोटया कंपन्या किंवा नवउद्यमींना कार्यालयीन जागांचे भाव परवडत नाहीत. त्यामुळे स्वतंत्रपणे कार्यालये थाटण्याऐवजी एका कार्यालयातील जागा वाटून घेतली जाते. कार्यालयातील सुविधाही वाटून वापरल्या जातात, त्यामुळे खर्चात बचत होते.

‘को-वर्किंग स्पेस’चे व्यवहार (लाख चौरस फुटांमध्ये)

पुणे -१२

बंगळूरु- ९

दिल्ली -८

मुंबई -३

अहमदाबाद- ३

हैदराबाद -२

चेन्नई -२

एकूण -३८

सध्या कार्यालयीन जागांची मागणी वाढली असून, देशाचे आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायाची संधी यांमुळे अनेक कंपन्या व्यवसायाचा विस्तार करीत आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे. त्यातही को-वर्किंग स्पेसला मागणी वाढत आहे.

– शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT