Demat account holders, MF investors alert! Deadline to add nominee ends on 31 december  Sakal
Personal Finance

Sebi: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेत? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा...

राहुल शेळके

DEMAT Nominee Deadline: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंड खात्यात नॉमिनी जोडण्यास सांगितले आहे. आणि त्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. असे न केल्यास खाते बंद केले जाऊ शकते.

नॉमिनीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराच्या पैशाचे कायदेशीर वारस ठरवले जातात. डिमॅट खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव जोडणे खूप सोपे आहे.

डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुमच्या डिमॅट खात्यात लॉग इन करा.

  • 'प्रोफाइल सेगमेंट' वर जा आणि 'माय नॉमिनीज' वर जा

  • 'अॅड नॉमिनी' किंवा 'ऑप्ट-आउट' निवडा.

  • तपशील भरा आणि नॉमिनीचा आयडी पुरावा अपलोड करा

  • टक्केवारीत नॉमिनी वाट्याचा समावेश करा

  • आधार OTP सह दस्तऐवजावर ई-स्वाक्षरी करा. नॉमिनी व्यक्तीचे तपशील तपासल्यानंतर, नॉमिनी जोडला जाईल.

कोणाला नॉमिनी केले जाऊ शकते?

वडील, आई, पती/पत्नी, भावंड, मूल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी केले जाऊ शकते. एक अल्पवयीन देखील नॉमिनी म्हणून जोडला जाऊ शकतो. अल्पवयीन मुलाच्या पालकांचा तपशील द्यावा लागेल.

यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबरपर्यंत होती

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की डिमॅट खात्यांच्या संदर्भात नावनोंदणी किंवा नॉमिनी व्यक्तीच्या निवडीचा तपशील सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नॉमिनीची नोंदणी करणे का आवश्यक आहे?

सेबीच्या या निर्णयाचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास मदत करणे आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना (लाभार्थ्यांना) मालमत्ता सुपूर्द करणे हा आहे.

सेबीने असेही म्हटले आहे की नॉमिनी नामांकित करण्याचा आदेश नवीन आणि विद्यमान गुंतवणूकदारांनाही लागू होतो. सेबीच्या नियमांनुसार, नवीन गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डीमॅट खाती उघडताना त्यांच्या सिक्युरिटीजची नोंदणी करावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांची 'चूक' अन् जेमिमा रॉड्रीग्जचे सदस्यत्व Khar Gymkhana club ने केलं रद्द

Google Pixel 8 Discount : गुगल पिक्सेल 8 फोनवर मिळतोय चक्क 38 हजारचा डिस्काउंट; काय आहे खास ऑफर? कुठे खरेदी कराल बघा

३१ ऑक्टोबरच्या आधी सांगतो...! MS Dhoni च्या मनात नेमकं चाललंय काय? CSK च्या गोटातून मोठे अपडेट्स

Baba Siddique: बाबा सिद्दिकींच्या हत्येचं पाकिस्तान कनेक्शन? मोठी माहिती समोर, आतापर्यंत १० जणांना अटक

'भारताची महासत्तेकडे वाटचाल ते समान नागरी कायदा..'; पट्टणकोडोलीत भाकणूक सांगताना काय म्हणाले फरांडेबाबा?

SCROLL FOR NEXT