GST Notice Sakal
Personal Finance

GST Notice: ड्रीम 11 ला DGGIचा दणका! पाठवली 28,000 कोटी रुपयांची नोटीस, काय आहे प्रकरण?

GST Notice: ड्रीम 11 ला पाठवण्यात आलेली नोटीस ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारणे दाखवा नोटीस आहे.

राहुल शेळके

GST Notice: डायरेक्टरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स (DGGI) मुंबईने दोन ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी नोटीस पाठवली आहे. ड्रीम 11 ला 28,000 कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर प्ले गेम 24/7 ला 20,000 कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

ड्रीम 11 ला पाठवण्यात आलेली नोटीस ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारणे दाखवा नोटीस आहे. ड्रीम 11 ने यापूर्वीच महाराष्ट्र राज्य जीएसटी नोटीसवर मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सर्व ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंग कंपन्या सध्या DGGI च्या रडारवर आहेत.

काही दिवसांपूर्वी, देशातील एकमेव लिस्ट गेमिंग कंपनी डेल्टा कॉर्पला सुमारे 16,800 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवण्यात आली होती. ही नोटीस जीएसटी विभागाने डेल्टा कॉर्प आणि त्याची सहयोगी कंपन्यांना पाठवली होती.

यामध्ये डेल्टा कॉर्पवर 11,139 कोटी रुपये आणि सहयोगी कंपन्यांवर 5,683 कोटी रुपये कर थकीत आहे. हैदराबादच्या डीजी इंटेलिजन्सने ही नोटीस जारी केली होती.

एनोक व्हेंचर्स प्रा. लि. एमडी आणि सीईओ विजय चोप्रा यांनी झी बिझनेसशी बोलताना सांगितले होते की, या कंपन्या नोटीसला विरोध करतील, इतके पैसे ते इतक्या सहजासहजी देऊ शकणार नाहीत.

ज्या मोठ्या नोटिसा आल्या आहेत त्यामुळे त्या कंपन्या पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, असे ते म्हणाले होते. एवढ्या कराचा बोजा कंपनी कशी उचलणार, कारण ती कर्ज घेऊन थकबाकी भरणार नाही. अशा परिस्थितीत यासाठी योजना बनवायला हवी, कारण तसे न केल्यास गेमींग उद्योगातील अनेक कंपन्या बंद पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT