Tata Group to buy Disney's stake in Tata Play  Sakal
Personal Finance

Tata Group: टाटा समूह विकत घेणार वॉल्ट डिस्ने कंपनीतील हिस्सा; 1 बिलियन डॉलरचा झाला करार

Tata Group: वॉल्ट डिस्ने कंपनीने भारतातील आपल्या टीव्ही चॅनेलचा (टाटा प्ले) एक छोटासा भाग टाटा समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्याने, डिस्ने भारतातील आपला उर्वरित व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या मीडिया कंपनीमध्ये विलीन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल.

राहुल शेळके

Tata Group: वॉल्ट डिस्ने कंपनीने भारतातील आपल्या टीव्ही चॅनेलचा (टाटा प्ले) एक छोटासा भाग टाटा समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्याने, डिस्ने भारतातील आपला उर्वरित व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या मीडिया कंपनीमध्ये विलीन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल.

या करारामध्ये, टाटा प्ले लिमिटेडचे ​​मूल्य अंदाजे 1 अब्ज डॉलर इतके आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाने डिस्नेकडून 29.8% स्टेक खरेदी केल्यानंतर या टीव्ही प्लॅटफॉर्मवर पूर्ण नियंत्रण ठेवले आहे. हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा भारतातील मीडिया मोठ्या प्रमाणावर बदलत आहे.

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात, डिस्नेने करारावर स्वाक्षरी केली ज्या अंतर्गत तिचे भारतीय युनिट Viacom 18 Media Pvt. मध्ये विलीन केले जाईल. अशाप्रकारे, Viacom 18 Media Pvt ही 750 दशलक्ष दर्शकांसह 8.5 बिलियन डॉलरची मनोरंजन कंपनी बनेल आणि जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशात या क्षेत्रावर वर्चस्व गाजवेल.

टाटा ग्रुप आणि TFCF कॉर्प (पूर्वी ट्वेन्टी-फर्स्ट सेंच्युरी फॉक्स म्हणून ओळखले जाणारे) यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून टाटा प्ले 2001 मध्ये सुरू करण्यात आली. ही कंपनी आपल्या ॲपद्वारे सेट-टॉप बॉक्सद्वारे टीव्ही दाखवणे आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देते.

टाटा सन्सच्या वेबसाइटनुसार, त्यांचे संपूर्ण भारतात 2 कोटी 30 लाख कनेक्शन आहेत. टाटा प्लेने 2022 मध्ये भारतातील स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता, परंतु अद्याप त्याची लिस्टिंग झालेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला टाटा समूहाने टेमासेक होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडमधील भागभांडवल विकत घेऊन टाटा प्लेमधील आपला हिस्सा 70% पेक्षा जास्त वाढवला. टेमासेकने 2007 मध्ये टाटा स्कायमध्ये प्रथम गुंतवणूक केली होती. (त्यावेळी ते टाटा स्काय म्हणून ओळखले जात होते).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT