M3M Group 
Personal Finance

M3M Group: ईडीचं आलं वादळ, 400 कोटींचा घोटाळा अन् 60 कोटींच्या आलिशान कार घेऊन गेलं...

ईडीने आलिशान कारपासून दागिने आणि रोख रक्कम जप्त केली होती.

राहुल शेळके

M3M Group: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी M3M रिअल इस्टेट ग्रुपचे संचालक बसंत बन्सल यांना अटक केली आहे. ईडीने यापूर्वीच बसंत बन्सल यांचा भाऊ रूप कुमार बन्सल यांना अटक केली आहे. दोन्ही भावांवर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

एजन्सीने M3M ग्रुप आणि IREO ग्रुपने 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांच्या लाँड्रिंगचा शोध घेतला आहे. ईडीने नुकतेच IREO ग्रुप आणि M3M ग्रुपवर छापे टाकले. यादरम्यान एजन्सीने आलिशान कारपासून दागिने आणि रोख रक्कम जप्त केली होती.

सात ठिकाणी टाकले छापे:

दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिल्यानंतर बसंत बन्सल यांना अटक करण्यात आली आहे. अटक झाल्यास त्यांना काही अटींवर जामीन दिला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

रिअल इस्टेट डेव्हलपर्सशी संबंधित दिल्ली आणि गुरुग्राममधील सात ठिकाणी छापे टाकून ईडीने काही दिवसांपूर्वी रूप कुमार बन्सलला अटक केली होती.अतिकच्या जवळच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे, 5 शहरांमध्ये कारवाई सुरू

अलीकडेच, ईडीने गुरुग्राममधील रिअल इस्टेट कंपनी M3M वर छापा टाकून 60 कोटींच्या आलिशान कार आणि 6 कोटींचे दागिने जप्त केले होते.

आयआरईओ ग्रुपच्या विरोधात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला.

गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडी आयआरईओ ग्रुपची चौकशी करत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ED ने सांगितले की M3M समूहाला IREO समुहाकडून शेल कंपन्यांच्या माध्यमातून 400 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर ही रक्कम डेवलपमेंट राइट म्हणून दाखवण्यात आली.

ही जमीन M3M ग्रुपची होती आणि तिचे बाजारमूल्य 4 कोटी रुपये होते. कंपनीने ही जमीन पाच शेल कंपन्यांना 10 कोटी रुपये देऊन विकली.

यानंतर, शेल कंपन्यांनी त्याच जमिनीचे डेवलपमेंट राइट IREO समूहाला सुमारे 400 कोटी रुपयांना विकले, ते लगेच हस्तांतरित करण्यात आले.

पैसे मिळाल्यानंतर शेल कंपन्यांनी पैसे एम3एम ग्रुपला ट्रान्सफर केले. एजन्सीने सांगितले की, या प्रकरणाच्या तपासात उघड झाले आहे की शेल कंपन्या M3M समूहाद्वारे चालवल्या जात होत्या.

रूप कुमार बन्सल M3M ग्रुप हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक:

आता दोन्ही भावांना 400 कोटींच्या हेराफेरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रूप कुमार बन्सल हे M3M ग्रुपचे प्रवर्तक आहेत.

हा समूह दिल्ली NCR मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक आहे. याशिवाय हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये या समूहाचे अनेक निवासी आणि इतर प्रकल्प आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT